मुंबई: अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेला मोठा धक्का देणारी घटना समोर आली असून, CIA च्या एका प्रणालीवर सायबर हल्ला करण्यात आला आहे. सोशल मीडिया, सॅटेलाईट इमेजेस आणि इतर सार्वजनिक माध्यमांतून मिळणारी माहिती एकत्रित करून तिचे विश्लेषण करणाऱ्या प्रणालीत हॅकर्सनी घुसखोरी केल्याची माहिती आहे. जागतिक स्तरावरील संभाव्य धोके ओळखण्यासाठी आणि महत्त्वाचे तपशील गोळा करण्यासाठी या व्यवस्थेचा वापर केला जात होता. या घटनेमुळे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेतील सुरक्षिततेबाबत नव्या चिंता व्यक्त केल्या जात आहेत.
https://www.prahaar.in/2026/11/24/balochistan-attack-bla-claims-killing-20-pakistani-soldiers-in-deadly-drone-and-ied-strikes-on-pakistan-army/
न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सायबर घुसखोरीचा फटका अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेसह ऑफिस ऑफ द डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्सलाही बसला आहे. मात्र, या हल्ल्यामागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे का? किंवा हॅकर्सने कशा पद्धतीने सिस्टिममध्ये प्रवेश केला? याबाबतची अद्याप माहिती समोर आलेली नाही. तपासाच्या पातळीवर या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. हा प्रकार अलीकडच्या काळात सुरू असलेल्या अनेक सायबर घटना आणि तांत्रिक अडचणींमुळे एक गंभीर बाब समजली जात आहे. अमेरिकेच्या कृषी विभागामध्ये झालेल्या सायबर हल्ल्याचा प्रकारही याच घटनेमध्ये येतो.
https://www.prahaar.in/2026/11/24/vietnam-gas-leak-blast-massive-explosion-at-hotpot-restaurant-kills-6-many-still-trapped-under-debris/
शिवाय, FBI मध्ये दोन वेगवेगळ्या सायबर हल्ल्यांच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पेंटागॉन आणि अमेरिकन होमलँड सिक्युरिटी विभागातही अशाच प्रकारचा सायबर हल्ल्याची घटना घडली होती. काही दिवसांपूर्वी हॅकर्सनी एफबीआयच्या नॅशनल क्राइम इन्फॉर्मेशन सेंटरच्या डेटाबेसला लक्ष्य केले होते. या माध्यमातून अमेरिकेतील विविध स्तरांवरील कायदा अंमलबजावणी यंत्रणांतील माहितीची देवाणघेवाण केली जाते. एफबीआयच्या या डेटाबेसवर झालेला हा दुसरा सायबर हल्ला होता; यापूर्वी काही महिन्यांपूर्वीही अशाच प्रकारचा हल्ला झाला होता. त्याआधी मायक्रोसॉफ्टलाही मोठा तांत्रिक बिघाड सहन करावा लागला होता, ज्यामुळे जगभरातील नोकरदारांना तब्बल 36 तास आपले काम बंद ठेवावे लागले होते. त्या काळात आउटलुक, टीम्स आणि इतर कार्यालयीन सेवांचा वापर करताना नोकरदारांना अडचणी आल्या होत्या.
https://www.prahaar.in/2026/11/24/revelations-about-nvidia-ceo-jensen-huangs-personal-life-resumes-duties-after-apologizing-to-the-board/
एकापाठोपाठ होणाऱ्या ह्या घटनांमुळे सरकारी यंत्रणांपासून ते मोठ्या तांत्रिक सेवांपर्यंत सायबर सुरक्षेची आव्हाने किती गुंतागुंतीची होत आहेत, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. गुप्तचर माहितीच्या विश्लेषणासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रणालीपर्यंत हॅकर्स पोहोचणे ही बाब अत्यंत संवेदनशील मानली जात आहे. आगामी काळामध्ये तपास यंत्रणा या हल्ल्यांचा स्रोत शोधून काढतात का आणि सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक केल्या जातात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.