Home ब्रेकिंग न्यूज ST प्रवाशांसाठी मोठा दिलासा! NCMC कार्डमध्ये धमाकेदार बदल, कोणाचे पैसे वाचणार आणि कसे?

ST प्रवाशांसाठी मोठा दिलासा! NCMC कार्डमध्ये धमाकेदार बदल, कोणाचे पैसे वाचणार आणि कसे?

0
ST प्रवाशांसाठी मोठा दिलासा! NCMC कार्डमध्ये धमाकेदार बदल, कोणाचे पैसे वाचणार आणि कसे?
ST प्रवाशांसाठी मोठा दिलासा (Photo: ANI)

महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सवलतधारक प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने सुरू केलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) योजनेत मोठे आणि दिलासादायक बदल करण्यात आले आहेत. कार्ड वापरताना येणाऱ्या तांत्रिक व व्यावहारिक अडचणी तसेच रिचार्जवरील अतिरिक्त शुल्कामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली होती. आता एसटी महामंडळाच्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे प्रवाशांची दीर्घकाळची मागणी मान्य झाली असून सवलतधारकांच्या एनसीएमसी कार्ड रिचार्जवरील कमिशन रद्द करण्यात आले आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी 5 रुपयांच्या पटीत रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून दैनंदिन प्रवास अधिक सुलभ आणि त्रासमुक्त होणार आहे.

ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारकांना एसटी प्रवासाच्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड रिचार्ज करणे आवश्यक असते. पूर्वी या कार्डच्या रिचार्जवर 11.80 रुपयांचे कमिशन आकारले जात होते आणि विविध करांचाही त्यात समावेश असायचा. त्यामुळे रिचार्ज केल्यानंतर ही रक्कम वजा होऊन उर्वरित रक्कमच कार्डमध्ये जमा होत होती. आता एसटी महामंडळाने हे कमिशन रद्द केल्यामुळे प्रवाशांचे थेट पैसे वाचणार आहेत. अधिकृत एजंट आणि वाहक यांच्याकडून टॉपअपसाठी एकसमान शुल्क आकारण्याची व्यवस्था केली असली तरी सवलतधारकांवरील कमिशनचा भार संपल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. मात्र या व्यवहारांवर व्यवहार कर आकारला जाणार असल्याचे एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

https://www.prahaar.in/2026/11/24/are-officials-themselves-stalling-the-municipal-commissioners-mission-pedestrian-first/

ग्रामीण भागातून धावणाऱ्या एसटी बसचे भाडे कमी असल्याने अनेकदा कार्डमध्ये अतिरिक्त रक्कम शिल्लक राहत असे. त्यामुळे कमी रकमेचा रिचार्ज करता यावा, अशी प्रवाशांची जोरदार मागणी होती. ही मागणी मान्य करत पूर्वीच्या 50 रुपयांच्या पटीऐवजी आता 5 रुपयांच्या पटीत रिचार्ज करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना 5, 10, 15, 20 अशा रकमांचे सोयीस्कर रिचार्ज करता येणार असून कार्डमध्ये अनावश्यक रक्कम अडकून राहण्याचा प्रश्नही सुटणार आहे. तसेच वारंवार मोठी रक्कम भरण्याची गरज राहणार नसल्याने ग्रामीण प्रवाशांचा आर्थिक ताणही कमी होण्यास मोठी मदत मिळणार आहे.

याशिवाय एसटी महामंडळाने एनसीएमसी कार्ड रिचार्ज करण्यासाठी भीम ॲपचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे प्रवाशांना घरबसल्या किंवा प्रवासादरम्यान सहज रिचार्ज करणे शक्य होणार आहे. यासोबतच एसटीतील वाहक, बस स्थानकांवरील टॉपअप काउंटर आणि अधिकृत एजंटांमार्फतही रिचार्जची सुविधा सुरू राहणार असल्याने प्रवाशांना गरजेनुसार विविध सोयीस्कर पर्याय उपलब्ध असतील आणि वेळ तसेच कष्ट वाचतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here