Home क्रीडा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेशच्या संघाची घोषणा

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेशच्या संघाची घोषणा

0
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेशच्या संघाची घोषणा
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेशच्या संघाची घोषणा (Photo: ANI)

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या बांगलादेश संघाची कसोटी मालिकेतील सुरुवात पराभवाने झाली असली, तरी आता त्यांनी आगामी एकदिवसीय मालिकेसाठी कंबर कसली आहे. कसोटी मालिकेनंतर होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपला अनुभवी संघ जाहीर केला आहे. आगामी तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे . या मालिकेत यष्टीरक्षक-फलंदाज लिटन दासच्या खांद्यावर संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. लिटन दास दुखापतीतून सावरल्यानंतर संघात परतला आहे. दक्षिण आफ्रिकेतील आव्हानात्मक परिस्थितीसाठी बांगलादेश सज्ज होत असताना, हा अनुभवी फलंदाज पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करेल.आफ्रिकन खेळपट्ट्यांचा विचार करता बोर्डाने गोलंदाजी भक्कम ठेवण्यावर भर दिला असून, वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानसह तस्किन अहमद आणि शरीफुल इस्लाम या त्रिकुटाचा संघात समावेश केला आहे.

फॉरवर्ड फलंदाज तौहीद हृदोय आणि तन्झिद तमीम यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. कसोटी कर्णधार नाझमुल होसेन शांतो यालाही वनडे संघात समाविष्ट केलं आहे. युवा फलंदाज परवेझ होसेन यालाही संधी दिली आहे. त्याचबरोबर वनडे सामन्यांमध्ये बांगलादेशसाठी सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या अष्टपैलू मेहिदी हसन मिराजचाही संघात समावेश करण्यात आला आहे. बांगलादेशने आगामी एकदिवसीय मालिकेसाठी वेगवान गोलंदाजांना प्राधान्य दिले आहे. खालेद अहमद, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान आणि शोरिफुल इस्लाम यांसारख्या गोलंदाजांचा संघात समावेश करण्यात आला आहे. बांगलादेशकडे मिराज, तनवीर इस्लाम आणि रिशाद हुसेन यांच्या रूपाने तीन फिरकी गोलंदाजांचे पर्यायही आहेत.

https://www.prahaar.in/2026/11/24/ind-vs-nz-2nd-test-new-zealand-bowler-blair-tickner-miss-second-match-due-to-a-hamstring-injury/

बांगलादेशचा वनडे संघ

एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेशचा संघ: लिटन दास (यष्टीरक्षक/कर्णधार), तौहीद हृदयॉय, तनजीद तमीम, परवेझ हुसैन, नईम शेख, नजमुल हुसेन शांतो, यासिर अली चौधरी, झाकीर अली अनिक, मेहदी हसन मिराज, तन्वीर इस्लाम, रिशाद हुसेन, सय्यद खालेद अहमद,तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान,शरीफुल इस्लाम.

बांगलादेश दक्षिण अफ्रिका मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला वनडे सामना, मंगळवार, 1 डिसेंबर 2026, बफेलो पार्क, ईस्ट लंडन सायंकाळी 5.00 वाजता.
  • दुसरा वनडे सामना, शुक्रवार, 4 डिसेंबर 2026, सेंट जॉर्ज पार्क, गकेबेर्हा (पोर्ट एलिझाबेथ) सायंकाळी 5.00 वाजता.
  • तिसरा वनडे सामना, सोमवार, 7 डिसेंबर 2026 न्यूलँड्स, (केप टाऊन) सायंकाळी 5.00 वाजता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here