प्रियांश आर्याने टी20 क्रिकेटमध्ये 181 धावा ठोकत 5 विक्रम रचले, जाणून घ्या

फोटो सौजन्य :  ANI

प्रियांश आर्याने तामिळनाडूविरुद्ध 68 चेडूंमध्ये 181 धावा केल्या. या स्फोटक खेळीसह प्रियांशने पाच विक्रम प्रस्थापित केले.

फोटो सौजन्य :  ANI

प्रियांशने 181 धावांसह सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम रचला आहे.  टी20 क्रिकेटमध्ये कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे.

फोटो सौजन्य :  ANI

प्रियांश आर्याने 68 चेंडूंमध्ये 266च्या स्ट्राईक रेटने 181 धावा केल्या. भारतीय भूमीवरील कोणत्याही फलंदाजाची सर्वोच्च धावसंख्या आहे.

फोटो सौजन्य :  ANI

कर्णधार प्रियांश आर्याने 181 धावांची धडाकेबाज खेळी केली. टी20 क्रिकेटमधील कोणत्याही कर्णधाराने केलेली ही सर्वोच्च खेळी आहे.

फोटो सौजन्य :  ANI

प्रियांश आर्याने SMAT 2026 मध्ये तामिळनाडूविरुद्ध 181 धावा केल्या. ही या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च खेळी आहे.

फोटो सौजन्य :  ANI

प्रियांश आर्याच्या खेळीत 19 षटकारांसह एका टी20 सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला. 

फोटो सौजन्य :  ANI

प्रियांशच्या आधी 2025 मध्ये फिन ॲलननेही आपल्या खेळीत 19 षटकार मारले होते.

फोटो सौजन्य :  ANI