Home क्राईम Pune Crime : पुण्यात प्रेमसंबंधाचा भयानक शेवट ! आयटी इंजिनिअर प्रियकरानेच केली प्रेयसीची हत्या, मृतदेहाशेजारी रात्रभर बसून राहिला अन्…

Pune Crime : पुण्यात प्रेमसंबंधाचा भयानक शेवट ! आयटी इंजिनिअर प्रियकरानेच केली प्रेयसीची हत्या, मृतदेहाशेजारी रात्रभर बसून राहिला अन्…

0
Pune Crime : पुण्यात प्रेमसंबंधाचा भयानक शेवट ! आयटी इंजिनिअर प्रियकरानेच केली प्रेयसीची हत्या,  मृतदेहाशेजारी रात्रभर बसून राहिला अन्…
(Photo: AI)

Pune Crime : पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या प्रियकरासोबत गेली साडेतीन वर्षे प्रेमसंबंध होते, त्याच प्रियकराने तरुणीची निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे, हत्या केल्यानंतर आरोपीने पळून जाण्याऐवजी रात्रभर प्रेयसीच्या मृतदेहाशेजारीच बसून काढली. त्यानंतर पहाटे स्वतः पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.

हत्या झालेल्या तरुणीचे नाव कोमल राजेंद्र डहाके असून, ती २७ वर्षांची होती. मूळची वर्धा येथील असलेली कोमल पुण्यातील विप्रो कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती. तर संशयित  आरोपी शुभम ज्ञानेश्वर काळबांडे हा ३१ वर्षीय तरुण असून, तो इन्फोसिस कंपनीत कार्यरत होता.

नेमकं काय घडलं ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल आणि शुभम यांच्यात गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, शुभमचे दुसऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय कोमलला होता. याच कारणावरून गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. रविवारी रात्री दोघेही एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यानंतर ते हिंजवडीतील साखरेवस्ती परिसरातील प्रिस्टाईन पीजीमध्ये कोमल राहत असलेल्या खोलीत परतले.

मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा त्यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद पहाटे तीनच्या सुमारास विकोपाला गेला. यावेळी संतापलेल्या शुभमने कोमलला हाताने आणि ठोशाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतकंच नाही, तर तिचं डोकं भिंतीवर आणि बेडवर आपटलं. या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने कोमलचा जागीच मृत्यू झाला.

https://www.prahaar.in/2026/11/24/nashik-uncle-and-nephew-critically-injured-after-being-hit-by-panchavati-express/

मृतदेहाशेजारी रात्रभर बसून राहिला अन्…

धक्कादायक बाब म्हणजे, कोमलचा मृत्यू झाल्यानंतरही शुभम खोलीतून बाहेर पडला नाही. तो रात्रभर तिच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला. अखेर पहाटे साडेसहाच्या सुमारास त्याने स्वतः हिंजवडी पोलिसांना फोन केला. घटनेची माहिती देतानाच त्याने रुग्णवाहिकेची मदतही मागितली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कोमलला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी शुभम काळबांडे याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here