Home ताज्या घडामोडी Panchayat 5 चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, रिंकु आणि सचिवची लव्हस्टोरी बहरणार; ‘फुलेरा’तील स्थानिक राजकारण बदलणार

Panchayat 5 चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, रिंकु आणि सचिवची लव्हस्टोरी बहरणार; ‘फुलेरा’तील स्थानिक राजकारण बदलणार

0
Panchayat 5 चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, रिंकु आणि सचिवची लव्हस्टोरी बहरणार; ‘फुलेरा’तील स्थानिक राजकारण बदलणार
फोटो सौजन्य: प्राईम व्हिडिओ (X Account)

मुंबई: बहुप्रतिक्षित ‘पंचायत’च्या पाचव्या सीझनचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. येत्या 3 डिसेंबर 2026 रोजी, ‘प्राईम व्हिडिओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. भारतासह जगभरामध्ये ही वेबसीरीज रिलीज होणार आहे. वेबसीरिजच्या पाचव्या सीझनची घोषणा केल्यापासून प्रेक्षकांमध्ये, यावेळी फुलेरा गावात पुढे काय होणार आहे, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. पण आता अखेर ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांना अनेक प्रश्नांची थेट नाही, पण अप्रत्यक्ष रित्या का होईना, काही प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. येत्या सीझनमध्ये प्रेक्षकांना, फुलेरा गावचं बदलेलं स्थानिक राजकारण, प्रधानजींचे मुख्य मारेकरी, गावातील दररोजचं हसतं- खेळतं वातावरण, गावकऱ्यांचं एकमेकांमधील नातं आणि रिंकु आणि सचिवजीं ची लव्हस्टोरी हे प्रमुख मुद्दे पाहायला मिळणार आहेत.

https://www.prahaar.in/2026/11/24/famous-iranian-singer-parastoo-ahmadi-lashed-74-times-without-hijab-in-music-concert/

गेल्या चार सीझनपासून, सचिवजी आणि रिंकी यांच्यात फुलत असलेल्या प्रेमाची फुलेरामधील कोणालाही पुसटशीही कल्पना नव्हती. त्यांनी आपले नाते अत्यंत साधेपणाने आणि शांतपणे जपले होते. पण ‘पंचायत 5’ मध्ये, हे रहस्य आता लपून राहणार नाही. बनराकस, क्रांती देवी आणि बिनोद कशा पद्धतीने सचिव आणि रिंकुच्या प्रेमाबद्दल संपूर्ण गावामध्ये भांडाफोड करणार? हे आपल्याला वेबसीरिज पाहिल्यानंतरच कळेल. सचिव आणि रिंकुच्या प्रेमाबद्दल कळाल्यानंतर, माजी प्रधान म्हणजे, बृजभूषण दुबेंचा राग अनावर होतो, रागाच्या भरात ते सचिवच्या म्हणजे अभिषेक त्रिपाठीच्या कानशि‍लात लावून देतात, ज्यामुळे परिस्थिती आणखी चिघळते. प्रधानजी बदलल्यानंतर गावपातळीवरील बदललेले राजकारण, नवीन आव्हाने आणि कौटुंबिक दबावामुळे सेक्रेटरीचा दृष्टिकोनही बदललेला दिसतो.

 

घाबरून जाण्याऐवजी किंवा माघार घेण्याऐवजी, तो एक नवीन नातेसंबंध प्रस्थापित करण्यावर ठाम असल्याचे दिसते. ट्रेलरमध्ये, सचिवजी रिंकीचा हात मागण्यासाठी माजी प्रधानजींकडे कशा पद्धतीने मागणी करतो? माजी प्रधान सचिवजी आणि रिंकुचं लग्न लावून देणार का? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला वेबसीरीज पाहिल्यानंतरच कळेल. एकंदरीत, ‘पंचायत’च्या पाचव्या सीझनमध्ये सत्तापालट आणि गावच्या राजकारणातील बदल सुरूच राहणार असले तरी, रिंकी आणि सचिवजी यांची प्रेमकथा हेच संपूर्ण कथानकाचा मुळगाभा आहे, हे मात्र नक्की… गावकऱ्यांसमोर सत्य उघड झाल्यावर सचिवजी त्यांचे प्रेम लग्नापर्यंत कसे घेऊन जातात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ‘पंचायत’ वेबसीरीजचा पहिला सीझन 2020 मध्ये प्रदर्शित झाला, त्यानंतर दुसरा सीझन 2022 साली, तिसरा सीझन 2024 साली, चौथा सीझन 2025 आणि पाचवा सीझन येत्या 3 डिसेंबर 2026 रोजी, प्राईम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे.

https://www.prahaar.in/2026/11/23/13-years-ago-when-my-life-was-changed-forever-shraddha-kapoor-pens-heartfelt-note-for-shreya-ghoshal-after-videos-from-latters-concert-go-viral/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here