Home देश PM Modi gift to Balen Shah : बालेन शाह यांना मोदींची भन्नाट भेट; संपूर्ण रामायण, बनारसी ब्रोकेड आणि गंगाजलाचा नेमका अर्थ काय ?

PM Modi gift to Balen Shah : बालेन शाह यांना मोदींची भन्नाट भेट; संपूर्ण रामायण, बनारसी ब्रोकेड आणि गंगाजलाचा नेमका अर्थ काय ?

0
PM Modi gift to Balen Shah : बालेन शाह यांना मोदींची भन्नाट भेट; संपूर्ण रामायण, बनारसी ब्रोकेड आणि गंगाजलाचा नेमका अर्थ काय ?

नवी दिल्ली : नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह सध्या भारत दौऱ्यावर आले असून, सोमवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. या वेळी पंतप्रधान मोदींनी बालेन शाह यांना ‘कलमकारी संपूर्ण रामायण’ पेंटिंग, ‘सदेली’ बॉक्समध्ये ठेवलेला बनारसी ब्रोकेड स्टोल आणि ‘गंगाजल’ भेट दिले. तसेच, भारतातील अयोध्या आणि नेपाळमधील जनकपूर यांना जोडणाऱ्या रेल्वे सेवेला या दोन्ही नेत्यांनी ऑनलाइन पद्धतीने हिरवा कंदील दाखवला.

प्रभू रामाच्या जीवनाचे प्रसंग दाखवणारी पेंटिंग

https://www.prahaar.in/2026/11/23/delhi-jama-masjid-police-station-man-attacks-cops-with-knife-policemen-injured/

पंतप्रधान मोदींनी बालेन शाह यांना दिलेली पेंटिंग प्रभू रामाच्या जीवनातील प्रमुख घटनांवर आधारित आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. या चित्रकृतीत रामाचा जन्म, वनवास, रावणावर मिळवलेला विजय आणि पुन्हा अयोध्येत परतणे यांसारखे प्रसंग सविस्तर रेखाटण्यात आले आहेत. आंध्र प्रदेशातील पारंपरिक ‘श्रीकालहस्ती’ पद्धतीने कापडावर बांबूच्या लेखणीने आणि नैसर्गिक रंगांचा वापर करून ही कलाकृती हाताने साकारली आहे. भारताची कथा सांगण्याची समृद्ध परंपरा, भक्ती आणि पारंपरिक कारागिरी यातून दिसून येते. शिवाय, रामाची अयोध्या आणि माता सीतेचे जन्मस्थळ मानले जाणारे जनकपूर यांच्यातील नात्यातून भारत आणि नेपाळमधील सांस्कृतिक व आध्यात्मिक जवळीक, तसेच दोन्ही देशांची सामायिक मूल्ये आणि मैत्री यातून स्पष्ट होते.

‘सदेली’ बॉक्समध्ये बनारसी ब्रोकेड स्टोल

याशिवाय पंतप्रधान मोदींनी बालेन शाह यांना ‘सदेली’ बॉक्समध्ये ठेवून एक बनारसी ब्रोकेड स्टोलही भेट दिला. वाराणसीच्या कुशल कारागिरांनी या रेशमी स्टोलवर बारीक नक्षीकाम आणि चमकदार जरीकाम केले आहे. हा स्टोल ज्या ‘सदेली’ बॉक्समध्ये ठेवण्यात आला होता, तो गुजराती परंपरेतील असून त्यावर लाकडाचे सुंदर कोरीव काम आणि भूमितीय नक्षी तयार केली आहे.

पितळी कलशात वाराणसीचे गंगाजल

तसेच, पंतप्रधान मोदींनी वाराणसीहून आणलेले गंगाजल एका पितळी कलशात भरून बालेन शाह यांना दिले. काशी विश्वनाथ मंदिराजवळील गंगेचे हे पाणी वाराणसीतील बाबा विश्वनाथ आणि काठमांडूतील भगवान पशुपतिनाथ यांच्यातील आध्यात्मिक नाते दर्शवते; कारण हे दोन्ही भगवान शिवाचेच रूप आहेत. भारत आणि नेपाळमधील खोलवर रुजलेले धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंध यातून अधोरेखित होतात, असे सूत्रांनी सांगितले. तसेच यातून दोन्ही देशांमधील पक्की मैत्री अधिक दृढ होऊन शांतता, समृद्धी आणि आध्यात्मिक एकतेचा संदेश दिला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here