Home ब्रेकिंग न्यूज Central Railway special block : मध्य रेल्वेचा विशेष ब्लॉक; कोकण कन्यासह अनेक एक्सप्रेस गाड्या थांबवल्या जाणार, वेळापत्रकातही बदल

Central Railway special block : मध्य रेल्वेचा विशेष ब्लॉक; कोकण कन्यासह अनेक एक्सप्रेस गाड्या थांबवल्या जाणार, वेळापत्रकातही बदल

0
Central Railway special block : मध्य रेल्वेचा विशेष ब्लॉक; कोकण कन्यासह अनेक एक्सप्रेस गाड्या थांबवल्या जाणार, वेळापत्रकातही बदल

मुंबई : पनवेल-कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सच्या (Panvel- Kalmboli Coaching complex) कामातील अडथळे दूर करण्यासाठी आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून विशेष पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येत आहे. २२/२३ नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा ब्लॉक २८/२९ नोव्हेंबरपर्यंत दररोज मध्यरात्री १.५० ते पहाटे ४.०५ या वेळेत असेल. या दरम्यान कर्जत अप आणि डाऊन मार्ग, दिवा-वसई-रोहा-पनवेल मार्ग तसेच पनवेल स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ७ समाविष्ट असतील. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पनवेलमध्ये रेल्वेच्या देखभालीची आणि कोचिंगची उत्तम व्यवस्था उपलब्ध होईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

२५/२६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री गाड्यांवर परिणाम

https://www.prahaar.in/2026/11/23/study-committee-for-the-revival-of-cooperative-sugar-mills-a-comprehensive-model-to-be-developed-under-the-chairmanship-of-the-sugar-commissioner/

या ब्लॉकचा फटका २५/२६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री काही मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना बसणार आहे. यामध्ये गाडी क्रमांक २२६५५ एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस आपटा येथे १ तास ३० मिनिटे थांबवली जाईल. गाडी क्रमांक १२१३४ मंगलूरु – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस जिते येथे १ तास थांबवली जाईल, तर गाडी क्रमांक २०११२ मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोकण कन्या एक्सप्रेस सोमाटने येथे १० मिनिटे थांबवली जाईल. तसेच, २६ नोव्हेंबर रोजी गाडी क्रमांक २२११५ लोकमान्य टिळक टर्मिनस – करमळी एक्सप्रेस ही लोकमान्य टिळक टर्मिनस येथून पहाटे ०४:०० वाजता सुटेल.

२६/२७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीची स्थिती

२६/२७ नोव्हेंबरच्या मध्यरात्री गाडी क्रमांक २२११५ लोकमान्य टिळक टर्मिनस – करमळी एक्सप्रेस आपटा येथे २ तास थांबवली जाईल. याशिवाय गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस जिते येथे १ तास आणि गाडी क्रमांक २०११२ मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोकण कन्या एक्सप्रेस सोमाटने येथे १० मिनिटे थांबवली जाईल. दुसरीकडे, २७ नोव्हेंबर रोजी गाडी क्रमांक ११०९९ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून पहाटे ०४:०० वाजता सुटेल.

२७/२८ नोव्हेंबरच्या मध्यरात्री गाड्यांचे नियमन

२७/२८ नोव्हेंबरच्या मध्यरात्री गाडी क्रमांक २२१४९ एर्नाकुलम – पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस आपटा येथे २ तास थांबवली जाईल, तर गाडी क्रमांक २०९९२ दौंड – अजमेर सुपरफास्ट एक्सप्रेस पोयांजे (मोहोपे) येथे १ तास थांबवली जाईल. गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस जिते येथे १ तास आणि गाडी क्रमांक २०११२ मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोकण कन्या एक्सप्रेस सोमाटने येथे १० मिनिटे थांबवली जाईल. याशिवाय, २८ नोव्हेंबर रोजी गाडी क्रमांक ११०९९ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून पहाटे ०४:०० वाजता सुटेल.

२८/२९ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीचा तपशील

२८/२९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री गाडी क्रमांक २२६५३ तिरुवनंतपुरम – हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस आपटा येथे १ तास ३० मिनिटे थांबवली जाईल. गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस जिते येथे १ तास आणि गाडी क्रमांक २०११२ मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोकण कन्या एक्सप्रेस सोमाटने येथे १० मिनिटे थांबवली जाईल. तसेच, २९ नोव्हेंबर रोजी गाडी क्रमांक ११०९९ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून पहाटे ०४:०० वाजता सुटेल.

रेल्वे प्रशासनाचे आवाहन

रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी आणि पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी हे ब्लॉक आवश्यक असून, प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल मध्य रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here