Home क्रीडा टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत अशी पोहोचणार! गणित काय ते समजून घ्या

टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत अशी पोहोचणार! गणित काय ते समजून घ्या

0
टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत अशी पोहोचणार! गणित काय ते समजून घ्या
भारत न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. यामुळे टीम इंडियाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठणं कठीण आहे. पण असं असलं तरी शक्य नाही असं अजिबात नाही. भारताला या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चक्रात सहा सामने खेळायचे आहे. यात एक सामना न्यूझीलंडविरुद्ध आणि पाच सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. (Photo: BCCI Twitter)
भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेची अंतिम फेरी गाठायची असेल तर उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. भारताला सहा पैकी सहा सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. (Photo: BCCI Twitter)
टीम इंडियाने उर्वरित सहा पैकी एकही सामना गमावला तर ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीवर लक्ष केंद्रीत करावं लागेल. कारण असं घडलं तर भारताचा अंतिम फेरीचा मार्ग ऑस्ट्रेलियाच्या हातात असणार आहे. (Photo: BCCI Twitter)
भारताने एक कसोटी सामना गमावला तर ऑस्ट्रेलियाला उर्वरित 9 पैकी कमीत कमी चार कसोटी सामन्यात पराभूत व्हावं लागेल. असं झालं तर भारताचं अंतिम फेरीचं गणि सुटू शकतं. (Photo: BCCI Twitter)
न्यूझीलंडने उर्वरित सात पैकी चार कसोटी सामन्यात विजय मिळवला तर भारताचं अंतिम फेरीचं गणित संपुष्टात येईल. मग भारताने बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया 5-0 मात दिली तरी अंतिम फेरी गाठू शकत नाही. (Photo: BCCI Twitter)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here