Home ताज्या घडामोडी 3500 विमानांना फटका! एका छोट्या तांत्रिक बिघाडामुळे अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; प्रवाशांची तारांबळ

3500 विमानांना फटका! एका छोट्या तांत्रिक बिघाडामुळे अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; प्रवाशांची तारांबळ

0
3500 विमानांना फटका! एका छोट्या तांत्रिक बिघाडामुळे अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; प्रवाशांची तारांबळ
3500 विमानांना फटका! एका छोट्या तांत्रिक बिघाडामुळे अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; प्रवाशांची तारांबळ फोटो सौजन्य: डेल्टा एअर लाईन्स

मुंबई: रविवारी अमेरिकेत हवाई प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागला. अमेरिकेतील प्रसिद्ध विमान वाहतूक कंपनी असलेल्या Delta Air Lines च्या एका तांत्रिक प्रणालीत बिघाड निर्माण झाल्यामुळे हजारो उड्डाणांवर त्याचा थेट परिणाम झाला. दरम्यान, ही कंपनी अमेरिकेतील प्रमुख विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या विमान कंपन्यांपैकी एक आहे. या बिघाडामुळे रविवारी तब्बल 3500 विमानांच्या उड्डाणांना विलंब झाला होता. रविवारी अमेरिकेतील विमानतळांवर, परिस्थिती इतकी गंभीर बनली होती की, अटलँटिक विमानतळावर काही काळासाठी विमानांची ये- जा थांबवावी लागली होती.

https://www.prahaar.in/2026/11/23/gold-prices-fall-yet-china-buys-in-record-amounts-what-exactly-is-the-strategy/

3500 उड्डाणे का रखडली?

या तांत्रिक समस्येचा फटका अटलँटिक आणि न्यूयॉर्क यांसारख्या अत्यंत वर्दळीच्या शहरांतील विमानतळांनाही बसला. अमेरिकी विमान वाहतूक नियामक संस्था FAA ने अटलांटाकडे जाणाऱ्या उड्डाणांवर सुमारे एक तासासाठी बंदी घातली होती. त्यानंतर ही बंदी उठवण्यात आली असली, तरी संपूर्ण विमानसेवेचे वेळापत्रक पुन्हा सुरळीत होण्यासाठी बराच वेळ लागला. या प्रचंड विलंबामागे Delta Air Lines च्या Weight and Balance या ऑटोमेटेड सिस्टममधील बिघाड हे मुख्य कारण ठरले आहे. कोणतेही विमान आकाशात झेप घेण्यापूर्वी त्याचे वजन आणि समतोल तपासणे अत्यंत आवश्यक असते. ही प्रणाली विमानाच्या सुरक्षित उड्डाणासाठी ह्या महत्त्वाच्या गोष्टीची तपासणी करते.

https://www.prahaar.in/2026/11/23/an-ingenious-hunting-strategy-of-early-humans-evidence-of-poisonous-weapons-from-125000-years-ago/

सोप्या शब्दांत सांगायचे तर, विमानात किती प्रवासी आहेत? प्रवाशांचे सामान किती आहे? आणि कार्गोचा भार किती आहे? या सर्वांची मोजणी या ऑटोमेटेड प्रणालीद्वारे केली जाते. यावरून विमान उड्डाणासाठी सुरक्षित आणि संतुलित आहे की नाही? हे निश्चित होते. ही यंत्रणा बंद पडल्यानंतर ह्या संपूर्ण गोष्टींची तपासणी कर्मचाऱ्यांना स्वतः करावा लागला. संगणकामार्फत झटपट होणारे काम कर्मचाऱ्यांना मॅन्युअली करावे लागल्याने प्रत्येक विमानाच्या उड्डाणाला अधिक वेळ लागला आणि विमान उड्डाणांचं संपूर्ण वेळापत्रक यामुळे पूर्णपणे विस्कळीत झाले होते. दरम्यान, झालेल्या घटनेमुळे Delta Air Lines कंपनीकडून झालेल्या गैरसोयीबद्दल प्रवाशांची माफी मागण्यात आली.

https://www.prahaar.in/2026/11/22/narendra-modi-nepals-prime-minister-balen-shah-to-visit-india-will-present-special-idol-gifts-to-modi-and-murmu/

कंपनीच्या टेक्निकल टीमकडून तातडीने ही समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. काही वेळाने ही ऑटोमेटेड प्रणाली पुन्हा पूर्ववत सुरू झाल्याची माहिती कंपनीने दिली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, रविवारी Delta आणि Delta Connection च्या सुमारे 5000 उड्डाणे नियोजित होती. अहवालानुसार, विलंबाच्या आणि रद्द झालेल्या उड्डाणांच्या जवळपास 70 टक्के घटना या तांत्रिक बिघाडाशी संबंधित होत्या, तर उर्वरित उड्डाण खराब हवामान आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलशी निगडित होते. या तांत्रिक बिघाडामुळे अडकलेल्या प्रवाशांना पुढील उपलब्ध विमानात बुकिंग देण्याची व्यवस्था Delta कडून करण्यात आली होती. गरजेनुसार प्रवाशांना जेवण आणि हॉटेलची सुविधाही करुन देण्यात आली होती. ज्यांची उड्डाणे रद्द झाली आणि ज्यांना पुढे प्रवास करायचा नव्हता, त्यांना रिफंडचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here