Home फोटो गॅलरी Malvika Gaekwad: ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेत्री मालविका गायकवाड देणार गुडन्यूज; पतीसोबत शेअर केले प्रेग्नन्सीचे खास फोटो!

Malvika Gaekwad: ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेत्री मालविका गायकवाड देणार गुडन्यूज; पतीसोबत शेअर केले प्रेग्नन्सीचे खास फोटो!

0
Malvika Gaekwad: ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेत्री मालविका गायकवाड देणार गुडन्यूज; पतीसोबत शेअर केले प्रेग्नन्सीचे खास फोटो!
(Photo: Instagram)
1. सोशल मीडियावर शेअर केली गुडन्यूज
मालविका सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतेच तिने पती सिद्धार्थ सिंघवीसोबतचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधून तिने आपल्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली.(Photo: Instagram)
2. बेबी बंप फ्लॉन्ट करत शेअर केले फोटो
या फोटोंमध्ये मालविका हिरव्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे, या फोटोंमध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसतेय. तिच्यासोबत पती सिद्धार्थ सिंघवीदेखील आहे. दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद या फोटोंमधून स्पष्ट दिसत आहे. (Photo: Instagram)
3. कॅप्शनने वेधले लक्ष
मालविकाने या फोटोंना दिलेल्या कॅप्शननेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘एका वर्षानंतर, तीच जागा, तोच ड्रेस आणि थोडं अधिक प्रेम’, अशा आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (Photo: Instagram)
4. ‘मुळशी पॅटर्न’मधून मिळाली विशेष ओळख
मालविका गायकवाड हिने ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटात चहावालीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिची भूमिका छोटी असली तरी ती प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. विशेषतः राहुल्याची मैत्रीण आणि चहाची टपरी चालवणारी मुलगी या भूमिकेमुळे तिला ओळख मिळाली.(Photo: Instagram)
5. 2020 मध्ये सिद्धार्थसोबत बांधली लग्नगाठ
मालविकाने 2020 मध्ये सिद्धार्थ सिंघवीसोबत लग्न केले. लग्नानंतरही ती अभिनयासोबत सोशल मीडियावर सक्रिय आहे. दोघेही आपल्या वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आता त्यांच्या आयुष्यात नव्या सदस्याचे आगमन होणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे. (Photo: Instagram)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here