Home साप्ताहिक अर्थविश्व NSEL Investors Relief: ‘एनएसईएल’ गैरव्यवहारात पैसे अडकलेल्या 5 हजार 682 गुंतवणूकदारांना मिळणार परतावा

NSEL Investors Relief: ‘एनएसईएल’ गैरव्यवहारात पैसे अडकलेल्या 5 हजार 682 गुंतवणूकदारांना मिळणार परतावा

0
NSEL Investors Relief: ‘एनएसईएल’ गैरव्यवहारात पैसे अडकलेल्या 5 हजार 682 गुंतवणूकदारांना मिळणार परतावा
(Photo: Twitter/X)

मुंबई : राष्ट्रीय स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडमधील (एनएसईएल) आर्थिक गैरव्यवहारामुळे गेल्या 13 वर्षांपासून परताव्याच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो गुंतवणूकदारांना अखेर दिलासा मिळणार आहे. एनएसईएल प्रकरणातील 5 हजार 682 गुंतवणूकदारांना एकरकमी तडजोड योजनेअंतर्गत (ओटीएस) सोमवारी 1 हजार 950 कोटी रुपयांचा परतावा दिला जाणार आहे. ही रक्कम गुंतवणूकदारांच्या बँक खात्यांत जमा करण्यात येणार आहे. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांना परतावा देण्याची राज्यातील ही पहिलीच घटना दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे 13वर्षांपासून रखडलेल्या या प्रक्रियेला गती मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.(NSEL Update)

https://www.prahaar.in/2026/11/23/an-ingenious-hunting-strategy-of-early-humans-evidence-of-poisonous-weapons-from-125000-years-ago/

एनएसईएलमध्ये पेमेंट डिफॉल्ट झाल्यामुळे देशभरातील 12 हजार 735 गुंतवणूकदारांचे सुमारे 5 हजार 403 कोटी रुपये अडकले होते. जुलै 2013 मध्ये हा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर एक्स्चेंजमधील व्यवहार बंद करण्यात आले. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली होती. आपली गुंतवणूक परत मिळावी यासाठी गुंतवणूकदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही साकडे घातले होते. महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमांतर्गत सक्षम प्राधिकरण, अंमलबजावणी संचालनालय (ईडी), उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय अशा विविध यंत्रणांकडे त्यांनी दाद मागितली होती. राज्य सरकारने या प्रकरणात सकारात्मक भूमिका घेतल्याने परताव्याच्या प्रक्रियेला गती मिळाली.(NSELScam)

या प्रकरणात परतावा देताना लहान गुंतवणूकदारांना प्राधान्य देण्यात आले. दोन लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक असलेल्या सर्व गुंतवणूकदारांना त्यांची संपूर्ण रक्कम परत करण्यात आली आहे. दोन ते दहा लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक असलेल्या गटातील बहुतांश गुंतवणूकदारांनाही परतावा मिळाला आहे. तर 20 लाख रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक असलेल्या गुंतवणूकदारांसाठी एकरकमी तडजोड योजनेचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या योजनेला संबंधित गुंतवणूकदारांनी मतदानाद्वारे संमती दिली.(Investor Refund)

https://www.prahaar.in/2026/11/23/horrifying-hit-and-run-in-bhandara-seven-year-old-girl-killed-after-being-struck-by-a-speeding-vehicle-driver-flees-the-scene/

एनएसईएल आणि संबंधित कंपन्यांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दिल्यानंतर तो मुंबईतील राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाकडे (एनसीएलटी) सादर करण्यात आला. गुंतवणूकदारांनी मतदानातून योजनेला मान्यता दिल्यानंतर न्यायाधिकरणाने प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर राष्ट्रीय कंपनी विधि अपील न्यायाधिकरण (एनसीएलएटी) आणि सर्वोच्च न्यायालयाच्या स्तरावरही योजनेला अंतिम मान्यता मिळाली. या मंजुरीनंतर आता 5 हजार 682 गुंतवणूकदारांना 1 हजार 950 कोटी रुपयांचा परतावा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.(Investor Protection)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here