Home साप्ताहिक रिलॅक्स Maitreya Movie Released: मैत्रीच्या पलीकडे जाणाऱ्या प्रेमाची कथा; क्रांती रेडकरांचा ‘मैत्रेया’ सिनेमागृहात

Maitreya Movie Released: मैत्रीच्या पलीकडे जाणाऱ्या प्रेमाची कथा; क्रांती रेडकरांचा ‘मैत्रेया’ सिनेमागृहात

0
Maitreya Movie Released: मैत्रीच्या पलीकडे जाणाऱ्या प्रेमाची कथा; क्रांती रेडकरांचा ‘मैत्रेया’ सिनेमागृहात
Photo: Prahaar

Maitreya Movie Released: ‘मैत्रेया’ या चित्रपटाच्या नावावरूच हे कथानक मित्रांच्या अवतीभवती फिरते हे कळून येतं. क्रांती रेडकर लिखित आणि दिग्दर्शित मैत्रेया चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची कथा जय, साजिरी, आर्जोयी आणि निर्वाण या चार तरुण मित्रांच्या भोवती फिरते. मैत्री, प्रेम आणि तरुणाईच्या नात्यांमधील भावनिक गुंतागुंतीवर चित्रपटाचं कथानक आधारित आहे. जिवलग मित्रांच्या आयुष्यात नव्या नात्याची एन्ट्री होते आणि चित्रपटाची कथा पुढे सरकते. मैत्रीच्या पलीकडे जाणाऱ्या आणि न बोललेल्या प्रेमाची चाहूल या चित्रपटातून पाहायला मिळते.

प्रसिद्ध संगीतकार पंकज पडघन यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. तरुणाईला ठेका धरायला लावणाऱ्या गाण्यांपासून ते मनाला भिडणाऱ्या प्रेमगीतांपर्यंत विविध छटा या चित्रपटातील गाण्यांत पाहायला मिळतात. गुरू ठाकूर आणि ओंकार मंगेश दत्त यांनी लिहिलेल्या या गाण्यांना शंकर महादेवन, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, सायली पंकज, शिवम सिंह, सिद्धांत भोसले आणि अपूर्वा निषाद यांसारख्या दिग्गज गायकांचा आवाज लाभला आहे. ‘टायटल साँग’मध्ये खुद्द क्रांती रेडकर यांनी रॅप लिहून गायला आहे.

जय, साजिरी, आर्जोयी आणि निर्वाण यांच्या आयुष्यातील नाती, त्यांच्यातील जवळीक आणि एकमेकांबद्दलच्या बदलत्या भावना ट्रेलरमधून समोर आल्या आहेत. मैत्रीच्या नात्यात दडलेलं प्रेम, प्रेमात निर्माण होणारा संभ्रम आणि या सगळ्यातून तयार होणारा भावनिक गुंता यामुळे चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढते. कधी मैत्रीच्या नात्यात प्रेमाची चाहूल लागते, तर कधी प्रेमाच्या भावनांनाच मैत्रीचा आधार मिळतो. एकमेकांसोबतचे सहज क्षण, मनात निर्माण होणारी ओढ आणि नात्यांमधील नकळत वाढणारा गुंता या चौघांच्या आयुष्यात नेमकं काय घडतंय? मैत्री आणि प्रेमाच्या या गुंत्यात काही नाती अपूर्णच राहाणार का? या प्रश्नांची उत्तरं आता चित्रपटातूनच मिळणार आहेत.

https://www.prahaar.in/2026/11/22/narendra-modi-nepals-prime-minister-balen-shah-to-visit-india-will-present-special-idol-gifts-to-modi-and-murmu/

लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे यांनी चित्रपटाविषयी बोलताना सांगितले, “मैत्री आणि प्रेम या भावना जितक्या सुंदर आहेत, तितक्याच गुंतागुंतीच्याही आहेत. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद खूप छान आहे. मनोरंजन विश्वातील कलाकारांनी केलेलं भरभरून कौतुक पाहून मी भारावून गेले आहे. आपण जवळपास वर्षभर एखाद्या सिनेमासोबत जगत असतो. आपण बनवलेली फिल्म सर्वप्रथम आपल्या घरच्या मंडळींना आवडावी, अशी मनात धाकधूक असते. अशावेळी जेव्हा आपल्या कामाची पावती मिळते, तेव्हा खूप आनंद होतो.

चित्रपटाच्या संकल्पनेविषयी त्या पुढे म्हणाल्या, “तरुण पिढीला आवडेल, त्याचबरोबर मध्यमवर्गीय मराठी कुटुंब आणि मराठी संस्कृतीशी नातं सांगणारी फिल्म बनवण्याची माझी इच्छा होती. आपल्या संस्कृतीशी जोडलेले सण-समारंभही प्रेक्षकांना या चित्रपटातून पाहायला मिळतील. अशा पार्श्वभूमीवर मला एक प्रेमकथा मांडायची होती.” ‘मैत्रेया’मधील गाणी ही केवळ मनोरंजनाचा भाग नसून, चित्रपटातील पात्रांच्या भावना आणि त्यांच्या नात्यांचा प्रवास उलगडणारा महत्त्वाचा दुवा आहेत. प्रत्येक गाण्यातून मैत्री, प्रेम, आनंद आणि भावनांचे वेगवेगळे पैलू मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे नात्यांच्या या अनोख्या प्रवासाची उत्सुकता आता वाढली असून, ‘मैत्रेया’ २० नोव्हेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here