Home ताज्या घडामोडी सस्पेन्स- थ्रिलर Drishyam The Conclusion पाहायचा राहून गेला? आता घरबसल्या पहा, कुठे आणि केव्हा रिलीज होणार चित्रपट

सस्पेन्स- थ्रिलर Drishyam The Conclusion पाहायचा राहून गेला? आता घरबसल्या पहा, कुठे आणि केव्हा रिलीज होणार चित्रपट

0
सस्पेन्स- थ्रिलर Drishyam The Conclusion पाहायचा राहून गेला? आता घरबसल्या पहा, कुठे आणि केव्हा रिलीज होणार चित्रपट
सस्पेन्स- थ्रिलर Drishyam The Conclusion पाहायचा राहून गेला? आता घरबसल्या पहा, कुठे आणि केव्हा रिलीज होणार चित्रपट फोटो सौजन्य: X Account

मुंबई: अजय देवगण आणि तब्बूचा ‘दृश्यम: द कन्क्लुजन’ 2 ऑक्टोबरला बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. अभिषेक पाठक दिग्दर्शित, ‘दृश्यम: द कन्क्लुजन’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. 594 कोटींची धमाकेदार कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. जर तुम्हाला ‘दृश्यम: द कन्क्लुजन’ चित्रपट थिएटर पाहता नसेल आला तर तुम्हाला आता ओटीटीवर चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. अद्याप चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीख जाहीर झाली नसून कोणत्या ओटीटीवर चित्रपट रिलीज होणार आहे, याची चर्चा सध्या नेटकऱ्यांमध्ये होत आहे.

https://www.prahaar.in/2026/11/22/gaurav-khannas-statement-on-his-relationship-with-akanksha-chamola-emphasizes-the-stability-that-marriage-brings/

विजय साळगावकर पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाला कायद्यापासून वाचवण्यासाठी शेवटचा प्रयत्न करताना दिसणार आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित हा क्राईम थ्रिलर या फ्रँचायझीमधील तिसरा आणि शेवटचा चित्रपट आहे. यात समीरच्या मृत्यूच्या जुन्या तपासाचा शेवट होतो. विजय पुन्हा एकदा एका पोलीस तपासाच्या केंद्रस्थानी सापडताना दिसणार आहे. तिसऱ्या भागामध्ये, गेल्या दोन भागांमधील अनेक जुनी पात्रे पुन्हा परत आली आहेत, ज्यांचे आयुष्य मागील भागातील घटनांमुळे पूर्णपणे बदलले आहे. यावेळी, तपासात नवीन पुरावे समोर येतात, साक्षीदारांच्या विधानांमध्ये विसंगती आढळते आणि विजयला आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन योजना आखावी लागते. त्यामुळे, जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, तर काळजी करू नका तुम्हाला आता हा चित्रपट घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार आहे.

https://www.prahaar.in/2026/11/22/mitwa-fame-singer-shafqat-amanat-ali-was-battling-cancer-now-set-to-return-to-the-world-of-music/

ज्या प्रेक्षकांना हा क्राईम थ्रिलर चित्रपट पाहता आला नाही, त्यांना येत्या शुक्रवारपासून चित्रपट घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, ‘नेटफ्लिक्स’ ओटीटीवर येत्या शुक्रवारपासून म्हणजेच, 27 नोव्हेंबर 2026 पासून प्रेक्षकांना ‘दृश्यम: द कन्क्लुजन’ चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहे. परंतू अद्याप निर्मात्यांकडून किंवा दिग्दर्शकांकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. विजयला कायदेशीर क्लीन चिट मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी पोलीस अधिकारी राजवीर सिंग तोमर या प्रकरणाचा तपास सुरू करतात, तेव्हा ह्या चित्रपटाची कथा सुरू होते. महेश देशमुख यांच्या विनंतीवरून तोमर पुन्हा हे प्रकरण उघडतात. मागील कायदेशीर कार्यवाहीपूर्वी विजयने समीरचे सांगाड्याचे अवशेष बदलले असावेत, असा तोमर यांना संशय आहे. त्यांच्या तपासामुळे ते एका वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा रक्षक असलेल्या रघुपर्यंत पोहोचतात.

https://www.prahaar.in/2026/11/21/a-major-twist-in-zhimma-3-who-will-be-joining-the-gang-of-women/

त्यानंतर हा तपास क्रिस्टोफर पिंटो नावाच्या व्यक्तीच्या अवशेषांशी जोडला जातो. मीरा आणि महेश आपल्या मुलाच्या मृत्यूमागील सत्य जाणून घेण्यासाठी इंद्रजित शेट्टीची मदत घेतात. पण जसजसा तपास पुढे जातो, तसतसे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे होत जाते. विजय साळगावकरचं कुटुंब ह्या चौकशीतून वाचतं का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ओटीटीवर चित्रपट पाहावं लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here