Home देश NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; सर्व 14 आरोपींवर आरोप निश्चित

NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; सर्व 14 आरोपींवर आरोप निश्चित

0
NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; सर्व 14 आरोपींवर आरोप निश्चित

NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात दिल्लीच्या फास्ट-ट्रॅक कोर्टाने शनिवारी (21 नोव्हेंबर) मोठा निर्णय दिला. सर्व 14 आरोपींवर औपचारिकपणे आरोप निश्चित करण्यात आले. राऊज अव्हेन्यू कोर्टातील विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर सर्व आरोपींनी स्वतःला निर्दोष असल्याचं सांगत खटला लढवण्याचा निर्णय घेतला.NEET-UG परीक्षा 3 मे 2026 रोजी झाली होती. त्यासाठी सुमारे 22 लाख विद्यार्थी बसले होते. पेपरफुटीचे आरोप समोर आल्यानंतर राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) 12 मे रोजी परीक्षा रद्द केली होती. त्यानंतर 21 जून रोजी पुन्हा परीक्षा घेण्यात आली होती. 18 नोव्हेंबर रोजी विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी आरोपींवर आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज 21 नोव्हेंबर रोजी सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीतून प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

आरोपींवर गुन्हेगारी कट, फसवणूक, विश्वासघात, पुरावे नष्ट करणे, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक परीक्षा (अयोग्य मार्गांचा प्रतिबंध) कायदा 2024 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.दोन आरोपपत्रांमध्ये 14 जणांची नावंया प्रकरणात सीबीआयने दोन वेगवेगळी आरोपपत्रं दाखल केली आहेत. पहिलं आरोपपत्र 28 जुलै रोजी दाखल करण्यात आलं होतं. त्यात 13 जणांची नावं होती. यामध्ये NTA शी संबंधित तीन विषय तज्ज्ञ, कोचिंग संस्थांशी संबंधित दोन व्यक्ती आणि अनेक दलालांचा समावेश होता.तीन विषय तज्ज्ञांची नावं अशी आहेत – मनीषा गुरुनाथ मांधरे (जीवशास्त्र), प्रल्हाद विठ्ठलराव कुलकर्णी (रसायनशास्त्र) आणि मनीषा संजय हवालदार (भौतिकशास्त्र).त्यानंतर सीबीआयने 14 ऑक्टोबर रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल केलं. त्यात महाराष्ट्रातील चहा विक्रेता शेषराव बजरंग सूर्यवंशी उर्फ राज सूर्यवंशी याचं नाव होतं. त्यामुळे एकूण आरोपींची संख्या 14 झाली आहे.

https://www.prahaar.in/2026/11/21/not-a-single-local-terrorist-is-active-in-the-kashmir-valley-union-home-minister-amit-shah-makes-a-major-claim/

सीबीआयकडे काय पुरावे?

आपला खटला सिद्ध करण्यासाठी सीबीआयने 360 साक्षीदार, 422 कागदपत्रं आणि 43 वस्तूंचा आधार घेतला आहे.आतापर्यंत सीबीआयने कोणत्याही सरकारी अधिकारी किंवा NTA च्या पदाधिकाऱ्याला आरोपी बनवलेलं नाही. सीबीआयचं म्हणणं आहे की, ही पेपरफुटी विषय तज्ज्ञ आणि खासगी व्यक्तींच्या नेटवर्कमुळे झाली आहे. या प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलं होतं. आता आरोप निश्चित झाल्याने खटल्याला गती मिळणार असून, पुढील सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here