मुंबई : “ज्या ‘टिप्या’ने आपल्या राजवटीत लाखो हिंदूंची हत्या केली, धर्मांतरे घडवून आणली आणि हिंदू महिलांवर जुलमी अत्याचार केले, त्या टीप्याचे उदात्तीकरण करणारे कोणतेही कार्यक्रम हिंदूराष्ट्रात सहन केले जाणार नाहीत”, असा इशारा राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शनिवारी दिला. पुण्यातील वानवडी येथे टिपू सुलतान जयंती साजरी केल्याने हिंदुत्ववादी संघटनांकडून आक्षेप नोंदवण्यात आला आहे. याबाबत ते कणकवली येथे माध्यमांशी संवाद साधत होते.
राणे म्हणाले, “आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये टिप्याला मोठे करण्याचे कुठलेही कार्यक्रम आम्ही सहन करणार नाही. राज्यात आणि देशात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. ज्या भूमीला आम्ही महादेवांची भूमी मानतो, तिथे टिपूसारख्या व्यक्तीचे उदात्तीकरण आम्हाला मान्य नाही. त्याच्या राजवटीत सर्वाधिक हिंदूंच्या हत्या झाल्या, धर्मांतरे करण्यात आली आणि हिंदूंच्या माता-भगिनींवर अत्याचार झाले. त्यामुळे टिपूची जयंती साजरी करणाऱ्यांवर राज्य सरकार म्हणून कारवाई करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. सरकारने अशा कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्यांवर याआधीही कारवाई केली आहे. हिंदुत्ववादी संघटनांनीही हे कार्यक्रम रोखले आहेत. ही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमी आहे. येथे टिपूचे उदात्तीकरण करणारा कोणताही कार्यक्रम आम्ही सहन करणार नाही. आमच्या राज्यात टिपूला मोठे करण्याची कुणीही हिंमत करू नये”, असा इशाराही त्यांनी दिला.(Minister Nitesh Rane)
https://www.prahaar.in/2026/11/21/enclosed-goods-shed-and-fertilizer-rake-point-worth-12-56-crore-sanctioned-for-yeola-railway-station/
कुर्ल्यात एका तरुण-तरुणीला काही अल्पवयीन मुलांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आल्याबाबत विचारले असता मंत्री राणे म्हणाले, “तो व्हिडीओ मीही पाहिला. काही लोक विसरत आहेत की हे त्यांच्या अब्बांचे पाकिस्तान नाही. अल्पवयीन मुलांचा वापर करून किंवा धर्माच्या नावाखाली मुंबई आणि महाराष्ट्रात अशा प्रकारची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी करू नये. अशा प्रकारची हिंमत पुन्हा केली, तर संबंधितांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. धार्मिक आधार घेऊन कायदा हातात घेण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.(Tipu Sultan)
छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष राजे होते आणि ‘गो-ब्राह्मण प्रतिपालक’ ही पदवी काही लेखकांनी स्वार्थासाठी दिली, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले, “पृथ्वीराज चव्हाण यांना वयानुसार थोडा विसर पडत आहे, असे दिसते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख होती. ब्रिटिशांनीही त्यांचा उल्लेख हिंदू सेनापती असा केला आहे. मुघल राजवटीतील काही राजे आपल्या भूमीत मंदिरे उद्ध्वस्त करून, माता-भगिनींवर अत्याचार करून हिंदू धर्म संपवण्याचा आणि इस्लामचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत होते. त्याविरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यामुळे उगाच सेक्युलर विशेषणे लावून आमच्या राजाची बदनामी करू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे हिंदू विरुद्ध मुसलमान असेच होते, हे आम्ही पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा पुन्हा ठणकावून सांगू.”
View this post on Instagram
लँड जिहाद करताना विचार करा!
मुंबई विमानतळाच्या टर्मिनल दोनजवळील अनधिकृत मशीद बांधकाम पाडण्याचे आदेश एमएमआरडीएने दिले आहेत. या बांधकामाविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार करून पाठपुरावा केला होता. याबाबत विचारले असता मंत्री नितेश राणे म्हणाले, “या लोकांना मजार आणि मशीद बांधण्यासाठी अधिकृत किंवा शासनाची मान्यता असलेली जागा मिळत नाही का? लँड जिहाद करून अशी बांधकामे जाणीवपूर्वक उभारली जात आहेत का? असा प्रश्न पडतो. एमएमआरडीएने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. किरीट सोमय्या यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. त्यामुळे अनधिकृत मशीद किंवा अन्य धार्मिक स्थळ उभारण्यापूर्वी संबंधितांनी विचार करावा; अन्यथा पुढील शुक्रवारी तिथे नमाज पढता येणार नाही,” असे ते म्हणाले.(Nitesh Rane Statement)