Home ताज्या घडामोडी Rava Momos Recipe: मैद्याला पर्याय ठरणारे रव्याचे मोमोज! घरीच बनवा चविष्ट आणि मऊसूत मोमोज

Rava Momos Recipe: मैद्याला पर्याय ठरणारे रव्याचे मोमोज! घरीच बनवा चविष्ट आणि मऊसूत मोमोज

0
Rava Momos Recipe: मैद्याला पर्याय ठरणारे रव्याचे मोमोज! घरीच बनवा चविष्ट आणि मऊसूत मोमोज
Photo: AI Generated

Rava Momos Recipe: आजकाल फास्टफूड खाण्याची सवय अनेक तरुणांना लागली आहे. रोजच्या नाष्ट्यापासून ते संध्याकाळच्या स्नॅक्सपर्यंत वेगवेगळे फास्टफूड तरुण खात असतात. तसेच सोशल मिडियावर देखील वेगवेगळे फास्टफूड पाहायला मिळतात. रस्त्यावर वडापाव, चायनीज फूड खाण्याबरोबरच अनेकजण सध्या मोमोज खाताना दिसतात. तरुणांमध्ये मोमोजची क्रेझ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. पातळ थर, चविष्ट सारण आणि मसालेदार लाल चटणी चाटात असली की मोमोज खाण्यात एक वेगळीच मजा असते. पण रोज जर आपण मैद्याचे मोमोज खाल्ले तर त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्याशी होईल असे अनेकांना वाटत असते. पण, जर तुम्हाला खरंच मोमोज खायचे असतील, तर तुम्ही रव्याचे मोमोज बनवून खाऊ शकता.

रव्याचे मोमोज चवीला अगदी मैद्याच्या मोमोजसारखेच लागतात, पण ते मैद्याच्या मोमोजपेक्षा अधिक आरोग्यदायी असतात. हे मोमोज कसे आणि कोणकोणत्या साहित्यापासून बनवतात ते पाहूया.

रव्याचे मोमोज बनवण्यासाठी लागणारे साहित्य

रवा – 1 कप
तेल – एक चमचा
पाणी – पीठ मळण्यासाठी
सोया चंक्स – 1/2 कप
कोबी – 1/4 कप
गाजर – 1/4 कप
कांद्याची पात – 1 किंवा 2
कांदा – 1 छोटा
लसूण – 2-3
आले – अर्धा इंच
मीठ – चवीनुसार
काळी मिरी – चवीनुसार

मोमोज बनवण्याची कृती

रव्याचे मोमोज तयार करण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात रवा घ्या, त्यात थोडे मीठ आणि कोमट पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठ मळताना पीठ मऊ आणि लवचिक असावे. आता ते एका ओल्या कापडाने झाकून ठेवा. जर पीठ एकत्र येत नसेल, तर तुम्ही त्यात थोडे दूध घालू शकता. त्यानंतर मोमोजचे सारण तयार करण्यासाठी सर्व भाज्या बारीक चिरुन घ्या किंवा खिसून घ्या. आता एक भांड्यात पाणी घालून सोया चंक्स उकळून घ्या. सोया चंक्स शिजल्यावर त्यातील सर्व पाणी पिळून काढा. त्यानंतर, सोया चंक्स वाटून त्याची पेस्ट बनवा.

त्यानंतर पॅनमध्ये सोया चंक्स घालून 1-2 मिनिटे शिजवून घ्या. त्यानंतर, सर्व भाज्या घालून 2 मिनिटे परतून घ्या. भाज्या जास्त शिजणार नाही याची काळजी घ्या. त्यात चवीनुसार मीठ आणि काळी मिरी घाला. जर हे लहान मुलांसाठी नसेल, तर तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा घालू शकता. हे मिश्रण रूमच्या तापमानावर थंड होऊ द्या. मळलेला रव्याचा गोळा 15-20 मिनिटे बाजूला ठेवल्यानंतर, त्याचे छोटे गोळे बनवून मोमोज तयार करा. छोटी पुरी बनवून झाल्यावर त्यात सारण भरा आणि मोमोजचा आकार द्या. नंतर, मोमोज स्टीमरमध्ये ठेवून 15 ते 20 मिनिटे शिजवा. याऐवजी, तुम्ही हे मोमोज 20 मिनिटे पाण्यात उकळवू शकता. उकळून झाल्यांनतर पाणी गाळून घ्या आणि मोमोज वेगळे करा. तुमचे स्वादिष्ट रव्याचे मोमोज तयार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here