Home ब्रेकिंग न्यूज Shiv Sena Blood Donation Camp: रक्ततुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुंबईत रक्तदान अभियान

Shiv Sena Blood Donation Camp: रक्ततुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुंबईत रक्तदान अभियान

0
Shiv Sena Blood Donation Camp: रक्ततुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुंबईत रक्तदान अभियान
(Photo: Twitter/x)

मुंबई : गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक जबाबदारीतून शिवसेना रविवारी, 22 नोव्हेंबरपासून मुंबईतील प्रत्येक विभागात रक्तदान शिबिरांचे आयोजन करणार आहे. मुंबईतील काही रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत सर्व विभागात तातडीने रक्तदान अभियान सुरू करण्याचे निर्देश मुंबईतील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शिवसैनिकांना दिले आहेत.(Shiv Sena Blood Donation Camp)

https://www.prahaar.in/2026/11/21/maherchi-sadi-sequel-if-maherchi-sadi-2-were-to-be-made-who-would-play-lakshmi-and-vicky-ajinkya-deo-suggests-names-of-actors/

या अभियानांतर्गत मुंबईतील शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, नगरसेवक, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना व सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या विभागात आणि विधानसभा क्षेत्रात पुढाकार घेऊन रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. या रक्तदान अभियानांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिरांना उपमुख्यमंत्री शिंदे स्वतः भेट देतील, असे सचिव मोरे यांनी सांगितले.(Blood Donation Drive Mumbai)

https://www.prahaar.in/2026/11/21/musical-fountain-has-been-set-up-at-powai-lake-a-light-and-sound-show-will-unfold-the-tales-of-the-marathas-valor/

प्रत्येक विभागात येत्या रविवारी अधिकृत रक्तपेढी व रुग्णालयांच्या सहकार्याने किमान एक रक्तदान शिबिर आयोजित करावे. शिवसैनिक, नागरिक, युवक व सामाजिक संस्थांना यात सहभागी करून घ्यावे. आयोजित शिबिराचा अहवाल व संकलित रक्ताच्या युनिट्सची माहिती सादर करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. (Maharashtra Blood Shortage)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here