Home ताज्या घडामोडी Bollywood Entertainment News: भाईजानने श्रद्धा कपूरची मागितली माफी! 4 डिसेंबरला ‘मातृभूमी’ आणि ‘ईठा’ची बॉक्स ऑफिस टक्कर

Bollywood Entertainment News: भाईजानने श्रद्धा कपूरची मागितली माफी! 4 डिसेंबरला ‘मातृभूमी’ आणि ‘ईठा’ची बॉक्स ऑफिस टक्कर

0
Bollywood Entertainment News: भाईजानने श्रद्धा कपूरची मागितली माफी! 4 डिसेंबरला ‘मातृभूमी’ आणि ‘ईठा’ची बॉक्स ऑफिस टक्कर
Photo: Instagram

Bollywood Entertainment News: बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘मातृभूमी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या 4 डिसेंबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, याच दिवशी अभिनेत्री श्रद्धा कपूरचा ‘ईठा’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या क्लॅशबद्दल अभिनेत्याने आपली प्रतिक्रिया दिली असून श्रद्धा कपूरची फोनवरून माफी मागितली आहे.

‘मातृभूमी’ आणि ‘ईठा’च्या क्लॅशवर भाईजानची प्रतिक्रिया

‘मातृभूमी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री चित्रांगदा सिंहसोबत सलमान खान एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी त्याला ‘मातृभूमी’ आणि ‘ईठा’ दोन्ही चित्रपटांच्या एकाच दिवशी होणाऱ्या प्रदर्शनाबद्दल विचारण्यात आले, त्यावर आपल्याला कधीही दुसऱ्या कोणत्याही चित्रपटाशी बॉक्स ऑफिसवर टक्कर द्यायची नसते, असे त्याने सांगितले.

https://www.prahaar.in/2026/11/21/a-plea-to-lord-vitthala-on-behalf-of-farmers-an-additional-allocation-of-25-crore-rupees-announced-for-the-development-of-pandharpur/

पुढे बोलताना, त्याच्या चित्रपटाची दुसऱ्या चित्रपटाशी टक्कर व्हावी, अशी त्याची अजिबात इच्छा नव्हती. मात्र या क्लॅशबद्दल त्याने श्रद्धा कपूरची माफीही मागितली आहे. श्रद्धाच्या ‘ईठा’ चित्रपटाला त्याने शुभेच्छाही दिल्या आहेत. जर आपल्याला या टक्करीबद्दल आधीच माहिती असती, तर आपण 4 डिसेंबर ही प्रदर्शनाची तारीख निवडली नसती, असे यावेळी बोलताना त्याने सांगितले.

चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 4 डिसेंबर का?

‘मातृभूमी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निवडण्यामागचे कारण यावेळी सलमाने स्पष्ट केले. सुरुवातीला हा चित्रपट 27 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, त्याच दिवशी सूरज बडजात्या यांचा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर 24 डिसेंबरला शाहरुख खानचा चित्रपट प्रदर्शित होण्याची चर्चा होती. शाहरुखच्या चित्रपटाशीही बॉक्स ऑफिसवर टक्कर नको असल्याने सलमानने ती तारीख टाळली. याशिवाय रणबीर कपूर, विकी कौशल आणि आलिया भट्ट यांचे चित्रपटही 26 जानेवारीच्या आसपास प्रदर्शित होणार असल्याने त्यांच्याशीही क्लॅश होऊ नये, याची काळजी घेतल्याचे सलमानने सांगितले. त्यानंतर ४ डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली.

या चर्चेदरम्यान चित्रांगदा सिंहने श्रद्धा कपूरचे कौतुक केले. श्रद्धा एक चांगली अभिनेत्री असून मातृभूमी आणि ईठा हे दोन्ही चित्रपट चांगले आहेत, असे तिने सांगितले. प्रेक्षकांना ‘मातृभूमी’ आणि ‘ईठा’ हे दोन्ही चित्रपट आवडतील, अशी आशाही तिने यावेळी व्यक्त केली. त्यामुळे आता 4 डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या दोन्ही चित्रपटांपैकी प्रेक्षक कोणत्या चित्रपटाला पसंती देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here