Home ब्रेकिंग न्यूज BMC Action : मालाड येथील नाहर नगर मार्गाचे रुंदीकरण,अडथळा आणणारी १७ बांधकामे हटवली, ‘पी पश्चिम’ विभागाची कारवाई

BMC Action : मालाड येथील नाहर नगर मार्गाचे रुंदीकरण,अडथळा आणणारी १७ बांधकामे हटवली, ‘पी पश्चिम’ विभागाची कारवाई

0
BMC Action : मालाड येथील नाहर नगर मार्गाचे रुंदीकरण,अडथळा आणणारी १७ बांधकामे हटवली, ‘पी पश्चिम’ विभागाची कारवाई
BMC Action : मालाड येथील नाहर नगर मार्गाचे रुंदीकरण,अडथळा आणणारी १७ बांधकामे हटवली, ‘पी पश्चिम’ विभागाची कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी): पी पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक ४६ मधील नाहर नगर मार्ग येथे प्रस्तावित १८.३० मीटर रुंदीच्या विकास नियोजन रस्त्याच्या रुंदीकरणासाठी बुधवारी १९ नोव्हेंबर २०२६ रोजी कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण १७ बांधकामे हटवण्यात आली आहे. स्थानिक भाजप नगरसेविका योगिता कोळी यांच्या प्रयत्नानंतर सह आयुक्त (परिमंडळ ४) डॉ. भाग्यश्री कापसे आणि सहायक आयुक्त (पी पश्चिम विभाग) कुंदन वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

रस्त्यांवरील वाहतुकीचे अडथळे दूर करून वाहतूक अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेकडून विविध ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.या ठिकाणी सद्यस्थितीत या मार्गाची रुंदी केवळ ४ मीटर होती. या कारवाईनंतर सुमारे ३० मीटर लांबीचा रस्ता प्रस्तावित १८.३० मीटर रुंदीपर्यंत मोकळा करण्यात आला आहे. या रुंदीकरणामुळे गिरीश केणी चाळीजवळील मार्गावरील वाहतुकीचा अडथळा दूर झाला आहे. या कारवाईमुळे प्रभाग क्रमांक ४६ मधील नाहर नगर मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

सह आयुक्त (परिमंडळ ४) डॉ. भाग्यश्री कापसे आणि सहायक आयुक्त (पी पश्चिम विभाग) कुंदन वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत परिरक्षण भागातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान, मोकळा करण्यात आलेला रस्ता वाहतुकीसाठी तातडीने खुला करता यावा, यासाठी रस्ते विभागाला सिमेंट काँक्रीटचा रस्ता त्वरित तयार करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

गिरीश केणी चाळ – रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा!

या रस्ता रुंदीकरणाच्या सुनील कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुंबई महानगरपालिकेच्या विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अखेर या कामाला यश मिळाले आहे. रहिवाशांचे योग्य प्रकारे पुनर्वसन केल्यानंतर बाधित घरांच्या निष्कासनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अरुंद रस्त्यावर पूर्वी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. आता लवकरच मोठ्या वाहनांची वाहतूक सुरळीत होईल, अशा प्रशस्त रस्त्याच्या निर्मितीचे काम हाती घेण्यात येणार आहे.नागरिकांना होणारा त्रास कमी करून परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here