Education News: बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) मुख्य परीक्षेचा निकाल 20 नोव्हेंबर 2026 रोजी जाहीर केला आहे. 4 ऑक्टोबर रोजी ही परीक्षा झाली होती. परीक्षेला बसलेले उमेदवार आता IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर आपला निकाल तपासू शकतात.
7,565 पदांसाठी भरती प्रक्रिया
IBPS PO/MT-XVI भरती प्रक्रियेद्वारे सहभागी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनीची एकूण 7,565 पदे भरली जाणार आहेत. मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात म्हणजेच मुलाखतीसाठी संधी मिळणार आहे. मुलाखतीसंदर्भातील वेळापत्रक आणि पुढील सूचना IBPS कडून अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केल्या जातील.
असा तपासा निकाल
उमेदवारांना पुढील सोप्या पद्धतीने निकाल पाहता येईल.
- सर्वप्रथम IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होमपेजवरील CRP PO/MT विभाग निवडा.
- IBPS PO Mains Result 2026 या लिंकवर क्लिक करा.
- नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि पासवर्ड अथवा जन्मतारीख टाका.
- लॉगिन केल्यानंतर निकाल स्क्रीनवर दिसेल.
- भविष्यातील संदर्भासाठी निकाल डाउनलोड करून त्याची प्रत जतन करा.
मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. मुलाखतीची तारीख, प्रवेशपत्र आणि कागदपत्र पडताळणीसंदर्भातील माहितीसाठी IBPS च्या अधिकृत सूचनांकडे लक्ष द्यावे.