महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी दीर्घकालीन नियोजन, जमिनीचे योग्य व्यवस्थापन, पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देणे आणि कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवणे हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. या सर्व आघाड्यांवर राज्य शासन अत्यंत प्रभावीपणे काम करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. अशोककुमार लाहिरी यांच्यासोबत राज्यातील विविध विकास प्रकल्पांबाबत शुक्रवारी सविस्तर आढावा बैठक पार पडली, त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नीती आयोगाचे आभारही माने. नीती आयोगाकडून राज्याला नेहमीच मार्गदर्शन आणि उपयुक्त सल्ले मिळत आले आहेत. यापुढेही आयोगाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यातील विकासकामे निश्चित गतीने पूर्ण करण्यासाठी शासन कृतीशील असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
वाढवण बंदराच्या कामाबाबत समाधान
या बैठकीत जमीन अधिग्रहणाच्या दीर्घकालीन नियोजनावर विशेष भर देण्यात आला. जमीन अधिग्रहण, पायाभूत सुविधा आणि कृषी क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावेत, अशी सूचना डॉ. अशोककुमार लाहिरी यांनी केली. जमिनीचा नियोजनबद्ध विकास आणि योग्य व्यवस्थापनातून राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळू शकतो, असंही त्यांनी सांगितलं. आज कमी किमतीत उपलब्ध असलेली जमीन भविष्यात अधिक मौल्यवान ठरेल; त्यामुळे पुढील पिढ्यांचा विचार करून भविष्यातील प्रकल्पांसाठी आगाऊ जमीन अधिग्रहण धोरण आखणे गरजेचे असल्याचे मत डॉ. लाहिरी यांनी मांडले. विशेष म्हणजे, राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाच्या कामाच्या प्रगतीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
https://www.prahaar.in/2026/11/20/five-thousand-deposited-into-the-accounts-of-9-4-million-drought-affected-farmers/
🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting with NITI Aayog Vice Chairman Dr Ashok Kumar Lahiri regarding the Mumbai Growth Centre, the river-linking project and the Vadhavan Port.
Senior officials were present.🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. अशोक कुमार लाहिरी यांच्या समवेत मुंबई ग्रोथ सेंटर, नदीजोड प्रकल्प आणि वाढवण बंदर यासंदर्भात बैठक.
यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में नीति आयोग के उपाध्यक्ष डॉ. अशोक कुमार लाहिरी इनके साथ मुंबई ग्रोथ सेंटर, नदी जोड़ परियोजना एवं वाढवण बंदरगाह के संदर्भ में बैठक।
इस अवसर पर वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।🕦 11.35am | 20-11-2026📍Varsha Bungalow, Mumbai | स. ११.३५ वा. | २०-११-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
@Dev_Fadnavis @ashoklahiribjp @NITIAayog
#Maharashtra #DevendraFadnavis #NITIAayog— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 20, 2026
बैठकीस परिवहन व बंदरे विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष गौरव दयाल, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व यंत्रणाप्रमुख उपस्थित होते.