Home ब्रेकिंग न्यूज Central Railway : नेव्ही हाफ मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या 2 विशेष लोकल; कल्याण आणि पनवेलहून मध्यरात्री सुटणार

Central Railway : नेव्ही हाफ मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या 2 विशेष लोकल; कल्याण आणि पनवेलहून मध्यरात्री सुटणार

0
Central Railway : नेव्ही हाफ मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या 2 विशेष लोकल; कल्याण आणि पनवेलहून मध्यरात्री सुटणार

मुंबई : ‘डब्ल्यूएनसी नेव्ही हाफ मॅरेथॉन-2026’ मध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने 2 विशेष उपनगरीय लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 21 आणि 22 नोव्हेंबरच्या मध्यरात्री या विशेष लोकल धावणार असून, कल्याण आणि पनवेल येथून त्या सुटतील. पहाटे 4 वाजता दोन्ही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे पोहोचतील.

कल्याणहून पहाटे 2.30 वाजता लोकल

मेन लाईनवरील विशेष लोकल कल्याण स्थानकातून मध्यरात्री 2.30 वाजता सुटेल. ही लोकल पहाटे 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. या मार्गावरील प्रवाशांना मॅरेथॉनसाठी वेळेत पोहोचण्याच्या दृष्टीने या सेवेचा फायदा होणार आहे.

https://www.prahaar.in/2026/11/20/five-thousand-deposited-into-the-accounts-of-9-4-million-drought-affected-farmers/

पनवेलहून 2.40 वाजता विशेष लोकल

हार्बर मार्गावरील विशेष लोकल पनवेल स्थानकातून मध्यरात्री 2.40 वाजता रवाना होईल. ही गाडीही पहाटे 4 वाजता CSMT येथे पोहोचणार आहे. त्यामुळे पनवेल आणि हार्बर मार्गावरील धावपटूंना प्रवासाची सोय उपलब्ध होईल.

सर्व स्थानकांवर थांबा

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही विशेष लोकल मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबतील. ‘डब्ल्यूएनसी नेव्ही हाफ मॅरेथॉन-2026’ मध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंनी या विशेष रेल्वे सेवांची वेळ लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here