उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आई सावित्री देवी यांचे शुक्रवारी उत्तराखंड राज्यातील पौरी गढवाल जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी निधन झाले. पौरी गढवालचे एसएसपी सर्वेश पनवार यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आईच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एसएसपी सर्वेश पनवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पौरी गढवाल जिल्ह्यातील पंचूर गावात सावित्री देवी यांचे निधन झाले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्रींवर शनिवारी हरिद्वारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन योगी यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. त्यांच्यासोबत संवाद साधून सविस्तर माहिती माध्यमांना देण्यात येणार आहे.”
https://www.prahaar.in/2026/11/20/bjp-25-point-agenda-mathura-meeting-election-strategy-caste-equations-booth-level-management/
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्रींचे निधन वयाच्या 91 व्या वर्षी झाले आहे. त्या गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होत्या आणि शुक्रवारी त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत सावित्री देवी श्रद्धांजली वाहिली आहे आणि योगी आदित्यनाथ यांच्या दु:खामध्ये सामील असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिले आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पोस्ट शेअर करत माहिती दिली की, “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री सावित्री देवी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. आईचे प्रेम, आशीर्वाद आणि माया ही जीवनातील सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. त्यांच्या निधनामुळे योगी यांच्या कुटुंबीयांमध्ये निर्माण झालेली पोकळी केव्हाही भरून न निघणारी आहे. मी बाबा केदार यांच्याकडे प्रार्थना करतो की, त्यांच्या आत्म्याला त्यांच्या पवित्र चरणी स्थान द्यावे. योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्हीही सहभागी आहोत.”
उत्तर प्रदेश के आदरणीय मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी की पूज्य माताजी श्रीमती सावित्री देवी जी के निधन का समाचार अत्यंत दुःखद एवं हृदयविदारक है।
माँ का स्नेह, आशीर्वाद और ममता जीवन की सबसे अनमोल पूंजी होती है। उनका जाना परिवार के लिए एक अपूरणीय क्षति है।
बाबा केदार से प्रार्थना है कि दिवंगत पुण्यात्मा को अपने श्रीचरणों में स्थान प्रदान करें तथा माननीय योगी जी सहित समस्त शोकाकुल परिजनों को इस असीम दुःख को सहन करने की शक्ति प्रदान करें।
ॐ शांति! 🙏
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) November 20, 2026
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री सावित्री देवी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. आई गमावण्याचे दुःख शब्दांत व्यक्त करता येत नाही. आयुष्यात आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही. या कठीण काळात मुख्यमंत्री आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाप्रती माझ्या संवेदना आहेत.”
उत्तर प्रदेश के माननीय मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी की पूज्य माताजी श्रीमती सावित्री देवी जी के निधन का समाचार अत्यंत दुखद है। मां का जाना वह दुःख है, जिसे शब्दों में व्यक्त कर पाना असंभव है। मां का स्थान जीवन में कोई नहीं ले सकता।
इस कठिन समय में मेरी संवेदनाएं मुख्यमंत्री जी एवं उनके समस्त परिवारजनों के साथ हैं। प्रभु श्रीराम जी दिवंगत को अपने श्रीचरणों में स्थान दें एवं शोकाकुल परिवार को यह असहनीय दुःख सहन करने की शक्ति प्रदान करें।
ॐ शांति!
— Dr Mohan Yadav (@DrMohanYadav51) November 20, 2026