फोटो सौजन्य : ANI
सलामीवीर यशस्वी जयस्वालने न्यूझीलंडविरुद्धच्या वेलिंग्टन कसोटीच्या पहिल्या डावात चांगली खेळी आणि सुरुवात करून दिली.
फोटो सौजन्य : ANI
केएल राहुलसोबत जयस्वालने 130 धावांची भागीदारी केली. तसेच अवघ्या 66 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.
फोटो सौजन्य : ANI
यशस्वीच्या कसोटी कारकिर्दीतील 14वं अर्धशतक होते. अर्धशतकात त्याने चौकारांच्या जोरावर 36 धावा केल्या हे विशेष.
फोटो सौजन्य : ANI
यशस्वी जयस्वालने या अर्धशतकासह SENA देशांमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
फोटो सौजन्य : ANI
जयस्वालने माजी भारतीय सलामीवीर गौतम गंभीरला (7) मागे टाकत सेना देशांमध्ये सलामीवीर म्हणून आपली आठवी 50+ धावसंख्या नोंदवली.
फोटो सौजन्य : ANI
सेना देशांमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक 50+ धावा करण्याचा विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. त्यांनी ही कामगिरी 19 वेळा केली आहे.
फोटो सौजन्य : ANI
केएल राहुल 12वेळा 50+ धावा करून दुसऱ्या क्रमांकावर आहे. वीरेंद्र सेहवागने 10 वेळा आणि मुरली विजयने नऊ वेळा ही कामगिरी केली आहे.
फोटो सौजन्य : ANI