भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना वेलिंग्टनमध्ये खेळला जात आहे. न्यूझीलंडचा पहिला डाव 368 धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना भारताच्या सलामीच्या फलंदाजांची जबरदस्त सुरूवात केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 1 गडी गमवून 159 धावा केल्या. (Photo: BCCI Twitter)भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी अर्धशतकी खेळी केली. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्याच भूमीत ही भागीदारी विक्रमी ठरली आहे. त्याचं कारणंही तसंच आहे. (Photo: BCCI Twitter)मागच्या 10 वर्षात न्यूझीलंडच्या भूमीवर एकाच कसोटी डावात पाहुण्या संघाच्या दोन्ही सलामीवीरांनी 50 पेक्षा जास्त धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2016 मध्ये हॅमिल्टन कसोटीदरम्यान पाकिस्तानचे सलामीवीर सामी अस्लम आणि अझर अली हा पराक्रम घडला होता. (Photo: BCCI Twitter)भारताकडून यशस्वी जयस्वालने 89 चेंडूचा सामना करत 85 धावा केल्या. यात त्याने 16 चौकार मारले. पण मॅट हेनरीच्या गोलंदाजीवर फटका मारताना चुकला आणि बाद झाला. तर केएल राहुलने 116 चेंडूत 5 चौकाराच्या मदतीने नाबाद 52 धावा केल्या. (Photo: BCCI Twitter)न्यूझीलंडने पहिल्या डावात केलेल्या 368 धावांचा पाठलाग करताना भारताने 1 गडी गमवून 159 धावा केल्या आहे. अजूनही भारतीय संघ 209 धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे तिसऱ्या डावात भारतीय संघ कशी कामगिरी करतो? याकडे लक्ष लागून आहे. (Photo: BCCI Twitter)