मुंबई : विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीवरून शिवसेनेवर नाराज असलेले पालघरचे माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत गुरुवारी वनगा यांनी कमळ हाती घेतले. खासदार क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त चव्हाण पालघर दौऱ्यावर आले असताना हा पक्षप्रवेश झाला. महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र असताना मित्रपक्षातील माजी आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.
https://www.prahaar.in/2026/11/19/road-cleared-in-the-patilwadi-area-of-dahisar-19-structures-removed-for-road-widening/
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आल्याने वनगा यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्या वेळी त्यांनी बंडाची भूमिका घेतली होती. उमेदवारीवरून निर्माण झालेल्या या नाराजीनंतर ते शिवसेनेतील कामकाजापासून दूर असल्याचे चित्र होते. त्यानंतर ते सक्रिय राजकारणात फारसे दिसले नव्हते. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्या राजकीय प्रवासाला नवे वळण मिळाले आहे.
https://www.prahaar.in/2026/11/19/improvement-committee-approves-redevelopment-proposal-for-khanna-house-in-worli/
श्रीनिवास वनगा हे पालघर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असून, जिल्ह्यात त्यांचा स्थानिक पातळीवर संपर्क आहे. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला साथ दिली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारीवरून निर्माण झालेल्या मतभेदांमुळे त्यांचे शिवसेनेशी असलेले संबंध ताणले गेले. त्यानंतर आता त्यांनी भाजपचा पर्याय निवडला आहे.