Mahabharat fame Actor Ayush Shah: ‘महाभारत’, ‘नव्या’ आणि ‘उत्तराण’ यांसारख्या टीव्ही मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता आयुष शाह याची मोठी फसवणूक झाली आहे. सिनेसृष्टीतून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. आयुष शाह याची तब्बल 4,44,48,000 रुपयांची फसवणूक झाली आहे. विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून अभिनेत्याची ही आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.
गुंतवणुकीवर भरघोस परतावा देऊ असे आमिष दाखवून आयुषची 4.44 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. मुंबईस्थित एका व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेच्या संचालकांविरुद्ध आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी तातडीने तपास करुन एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
https://www.prahaar.in/2026/11/18/maharashtrachi-hasyajatra-fame-rasika-vengurlekars-dream-of-owning-a-home-comes-true-housewarming-ceremony-held-for-her-new-home/
नेमकं प्रकरण काय?
अभिनेता आयुष शाहला फ्लेज इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटीसह विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. जर तुम्ही गुंतवणूक केली तर खात्रीशीर आणि चांगला परतावा देखील देऊ, असे आश्वासनही अभिनेत्याला देण्यात आले होते. परंतु, आरोपी एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी आयुष शाह याचा विश्वास मिळवण्यासाठी फिर्यादीला बनावट बँक स्टेटमेंट देखील पाठवले होते, अशी माहिती आहे.
तसेच शाह यांनी पोलिसांना, आरोपींनी आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून त्यांना विमान वाहतूक आणि हॉस्पिटॅलिटी उद्योगांशी संबंधित असलेल्या त्यांच्या कंपनीत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले, असे सांगितले. फसवणूक, बनावटगिरी, विश्वासघात आणि गुन्हेगारी कट यांसारख्या भारतीय न्याय संहितेच्या कलमांखाली नोंदवण्यात आलेल्या एफआयआरमध्ये कंपनीचे तीन संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांसह एकूण पाच जणांची नावे आहेत.
आपली फसवणूक झाली असल्याचं समजताच अभिनेत्याने थेट ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. आणि पोलिसांना फसवणूक झाली असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी या प्रकरणी बिश्वजित बादलचंद्र घोष, पियाली चॅटर्जी, बिज्योया दास, शाबाब हुसैन आणि बादलचंद्र घोष यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच भारतीय न्याय संहिता कलम 316(2), 318(2), 318(4), 336(2), 336(3), 340(2), 61(1) आणि 3(5) अंतर्गत पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली आहे. या प्रकरणी आणखी कुणाचा सहभाग आहे का? याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.