भारत न्यूझीलंड कसोटी मालिकेतून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा मैदानात उतरला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने पहिल्याच षटकात विकेट काढली आणि कमबॅक केलं. यासह भारतासाठई सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दहावं स्थान पटकावलं आहे. (Photo: BCCI Twitter)जसप्रीत बुमराहने सामन्याच्या पहिल्या दिवशी पाच निर्धाव षटकांसह 12 षटके टाकली आणि तीन बळी घेतले. त्याने फक्त 31 धावा दिल्या. या तीन विकेटसह जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये 237 बळी पूर्ण केले आहेत. (Photo: BCCI Twitter)जसप्रीत बुमराहच्या नावावर 237 विकेट असून त्याने माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथला मागे टाकलं. जवागल श्रीनाथ यांनी 67 कसोटी सामन्यांमध्ये 236 बळी घेतले होते. बुमराहने आता त्यांना मागे टाकून दहावे स्थान पटकावले आहे. (Photo: BCCI Twitter)भारताकडून अनिल कुंबळेने 132 कसोटी सामन्यांमध्ये 619 बळी घेतले आहेत. अनिल कुंबळे भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला आहे. तर 106 कसोटी सामन्यांमध्ये 537 बळींसह अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. (Photo: BCCI Twitter)भारताचा सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत कपिल देवही आहे. कपिल देवने 131 कसोटी सामन्यांमध्ये 434 बळी घेतले आहेत. बुमराह अजूनही त्यांच्यापासून खूप मागे असला तरी तो हळूहळू त्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल करत आहे. (Photo: BCCI Twitter)