महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर मागच्या तीन पर्वापासून नेतृत्वाची जबाबदारी ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर आहे. पण त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी हवी तशी झाली. त्यामुळे त्याच्या नेतृत्वावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. इतकंच काय तर त्याची तुलना थेट कर्णधार म्हणून एमएस धोनीशी केली गेली. (Photo: ANI)महेंद्रसिंह धोनी आयपीएल स्पर्धेतून निवृत्ती जाहीर केली आहे. तसेच मेंटॉर म्हणून भूमिका बजावणार आहे. या पार्श्वभूमीवर माजी क्रिकेट अंबाती रायुडू याने सांगितलं की, धोनीच्या गैरहजेरीत ऋतुराज गायकवाडवरील कर्णधारपदाचं ओझं कमी झालं आहे. (Photo: ANI)अंबाती रायुडू याने क्रिकबझशी बोलताना सांगितलं की, “एमएस धोनी संघात नसल्यामुळे कर्णधारावरील भार थोडा कमी होईल. कारण जेव्हा एमएस धोनी संघात असतो, तेव्हा तुम्ही मंजुरी आणि निर्णय घेण्यासाठी नेहमी त्याच्याकडे पाहता आणि तो तुमचे मूल्यमापन करत आहे असे तुम्हाला नेहमी वाटते. एवढ्या मोठ्या उंचीची व्यक्ती संघात असणे नेहमीच आव्हानात्मक असतं.” (Photo: ANI)ऋतुराज गायकवाडच्या खेळण्याच्या शैलीवर अंबाती रायुडू याने मत व्यक्त केलं आहे. तसेच एक सल्लाही दिला आहे. अंबाती रायुडू म्हणाली की, “तो एक क्लासिकल फलंदाज आहे, पण त्याला खेळात थोडा अधिक बारकावा आणण्याची गरज आहे, आणि मला वाटते की तो हे काळजीपूर्वक स्वीकारत आहे. त्याच्यात प्रतिभा आहे, तो सीएसकेसाठी सामना जिंकून देणारा खेळाडू राहिला आहे, त्याने भूतकाळात सीएसकेसाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे, त्याला फक्त आता अधिक चांगली कामगिरी करून अपेक्षा पूर्ण करण्याची गरज आहे.” (Photo: ANI)कर्णधारपदाची धुरा हाती घेतल्यापासून ऋतुराज गायकवाडची फलंदाज म्हणून कामगिरी निराशाजनक राहिली आहे. यावर रायुडू म्हणाला की, “एक फलंदाज म्हणून ऋतुराज गायकवाड आपल्या खेळाला न्याय देऊ शकलेला नाही, कारण त्याने प्रत्येक गोष्टीकडे अत्यंत हट्टी वृत्तीने पाहिले आहे.” (Photo: ANI)