Home देश Vande Bharat Express : नातेवाईकांना निरोप देण्यासाठी वंदे भारतमध्ये चढले अन् अडकले! 12 जणांना 36,000 रुपयांचा दंड

Vande Bharat Express : नातेवाईकांना निरोप देण्यासाठी वंदे भारतमध्ये चढले अन् अडकले! 12 जणांना 36,000 रुपयांचा दंड

0
Vande Bharat Express : नातेवाईकांना निरोप देण्यासाठी वंदे भारतमध्ये चढले अन् अडकले! 12 जणांना 36,000 रुपयांचा दंड

उत्तर प्रदेश : रेल्वे प्रवासात नातेवाईकांना निरोप देण्यासाठी ट्रेनमध्ये चढणे 12 जणांना चांगलेच महागात पडले. उत्तर प्रदेशातील कानपूर सेंट्रल रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चढलेल्या या प्रवाशांचे ट्रेनचे स्वयंचलित दरवाजे बंद झाल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. ट्रेन सुटल्यानंतर त्यांना इटावा स्थानकावर उतरवण्यात आले. रेल्वे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या सर्वांना प्रत्येकी 3,000 रुपये, म्हणजे एकूण 36,000 रुपयांचा दंड भरावा लागला.

https://www.prahaar.in/2026/11/18/fake-local-train-pass-created-using-chatgpt-traveled-in-ac-local-trains-for-a-month-until-a-ticket-collector-finally-caught-him/

ही घटना वाराणसी ते नवी दिल्लीदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये घडली. कानपूरमधील वेगवेगळ्या भागांतून आलेले 12 जण आपल्या नातेवाईकांना ट्रेनमध्ये बसवण्यासाठी आणि त्यांना सामानासह व्यवस्थित जाण्यास मदत करण्यासाठी गाडीत चढले होते. मात्र, ते ट्रेनमध्ये असतानाच स्वयंचलित दरवाजे बंद झाले आणि ट्रेन स्थानकावरून रवाना झाली.

स्वयंचलित दरवाजांमुळे ट्रेनमधून उतरता आले नाही

वंदे भारत ट्रेनचे दरवाजे ठराविक स्थानकांवरच उघडत असल्याने या प्रवाशांना कानपूरमध्ये उतरता आले नाही. ट्रेन सुटल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या कुटुंबीयांची चिंता वाढली. ट्रेनमधील कर्मचाऱ्यांकडे दरवाजे उघडण्याची विनंती करण्यात आली. मात्र, सुरक्षा नियम आणि तांत्रिक कारणांमुळे ट्रेन चालू असताना दरवाजे उघडणे शक्य नव्हते.

इटावा स्थानकावर उतरवले, 36 हजारांचा दंड

या घटनेची माहिती रेल्वे नियंत्रण कक्षाला देण्यात आली. त्यानंतर ट्रेन इटावा जंक्शन येथे थांबवण्यात आली. रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि सरकारी रेल्वे पोलीस (GRP) यांच्या पथकाने सर्व 12 जणांना सुरक्षितपणे ट्रेनमधून उतरवले. त्यांची चौकशी करून घटनेची नोंद करण्यात आली.

परवानगीशिवाय ट्रेनमध्ये प्रवेश केल्यामुळे रेल्वेच्या वाणिज्य विभागाने प्रत्येकाला 3,000 रुपयांचा दंड ठोठावला. एकूण 36,000 रुपये दंड वसूल केल्यानंतर त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली. या घटनेमुळे रेल्वे प्रवासात नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here