Home मुख्य पोस्ट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी घेतली भाजपच्या सर्व मंत्र्यांची बैठक; ‘सेवादूत अभियाना’च्या अंमलबजावणीचा आढावा

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी घेतली भाजपच्या सर्व मंत्र्यांची बैठक; ‘सेवादूत अभियाना’च्या अंमलबजावणीचा आढावा

0
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी घेतली भाजपच्या सर्व मंत्र्यांची बैठक; ‘सेवादूत अभियाना’च्या अंमलबजावणीचा आढावा
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी घेतली भाजपच्या सर्व मंत्र्यांची बैठक (Photo: X)

मुंबई : भाजपचा संघटनात्मक विस्तार अधिक व्यापक करण्याबरोबरच पक्षसंघटना आणि सरकार यांच्यातील समन्वय वाढविण्याच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री उशिरा राज्यातील भाजप मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ‘सेवादूत अभियान’ प्रभावीपणे राबविण्याबरोबरच जिल्हा आणि तालुका स्तरावर शासकीय सदस्यांच्या नियुक्त्या करण्याबाबत चर्चा करण्यात आली. सरकारच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेने काम करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.

भाजप परिवाराची संघटनात्मक रचना अधिक बळकट करणे आणि पक्षाचा विस्तार तळागाळापर्यंत नेणे, हा या बैठकीचा प्रमुख उद्देश होता. ‘सेवादूत अभियाना’च्या माध्यमातून जनतेशी थेट संपर्क वाढविणे, तसेच अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक नियोजन यावर विचारविनिमय करण्यात आला. जिल्हा आणि तालुका स्तरावर शासकीय सदस्यांच्या तातडीने नियुक्त्या केल्यास स्थानिक पातळीवर शासन आणि संघटना यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी होऊ शकतो, या अनुषंगानेही चर्चा झाली.

https://www.prahaar.in/2026/11/18/last-local-terrorist-of-lashkar-killed-union-home-minister-amit-shah-statement-praises-security-forces/

समाजातील शेवटच्या घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकार विविध योजना आणि उपक्रम राबवत आहे. या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आणि भाजपची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविणे, यासाठी पक्षाच्या मंत्र्यांसह पदाधिकाऱ्यांनी सक्रियपणे काम करावे, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली.

या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, गिरीश महाजन, जयकुमार गोरे, नितेश राणे, मंगलप्रभात लोढा, आकाश फुंडकर, अतुल सावे, अशोक उईके, संजय सावकारे, राज्यमंत्री पंकज भोयर, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ यांच्यासह माध्यम विभागप्रमुख गोविंद येतयेकर, प्रदेश प्रवक्ते नवनाथ बन आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here