Home महाराष्ट्र नाशिक Nashik : इगतपुरीत साई निवाऱ्याचा स्लॅब कोसळला,15 ते 17 साई भक्त गंभीर जखमी

Nashik : इगतपुरीत साई निवाऱ्याचा स्लॅब कोसळला,15 ते 17 साई भक्त गंभीर जखमी

0
Nashik : इगतपुरीत साई निवाऱ्याचा स्लॅब कोसळला,15 ते 17 साई भक्त गंभीर जखमी

इगतपुरी : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे एक धक्कादायक दुर्घटना घडली आहे. येथील ‘साई निवारा’ या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक इमारतीचा स्लॅब कोसळल्याने एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत १५ ते १७ साई भक्त गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जाणारे शहापूर परिसरातील काही भाविक इगतपुरीतील साई निवारा येथे मुक्कामासाठी थांबले होते. रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर सर्व भाविक विश्रांती घेत असतानाच अचानक इमारतीच्या स्लॅबचा भाग कोसळला. यावेळी स्लॅबचे गर्डर तसेच लोखंड आणि सिमेंटपासून बनवलेल्या फरशा थेट भाविकांच्या अंगावर पडल्या.

https://www.prahaar.in/2026/11/17/nashik-crimeshocking-case-of-ai-deepfake-uncovered-in-nashik-using-a-girls-exact-face-and-voice-the-perpetrators/

अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे निवाऱ्यात एकच गोंधळ उडाला. स्लॅब कोसळल्याचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकही घटनास्थळी जमा झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक राज जावरे, पोलीस प्रशासन आणि महामार्ग टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

यानंतर स्थानिक नागरिक आणि मदत पथकांच्या सहकार्याने जखमी भाविकांना बाहेर काढून तातडीने इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या सर्व जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू असून, दुर्घटनेमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या घटनेमुळे प्रवासादरम्यान भाविकांच्या मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. साई निवारा इमारतीची अवस्था आणि स्लॅब कोसळण्यामागील नेमके कारण काय, याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here