मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या वांद्रयातील के. बी. भाभा महानगरपालिका रुग्णालयातील खुल्या जागेवर सार्वजनिक खाजगी सहभाग प्रोत्साहन धोरणांतर्गत अर्थात पीपीपी तत्वावर नवीन नर्सिंग कॉलेज सुरु करण्यात येणार आहे. मात्र, या नर्सिंग कॉलेजला आणि यासाठी यासाठीच्या नियुक्त संस्थेला उबाठाने विरोध केला आहे. याठिकाणी डिप्लोमा नव्हेतर डिग्री नर्सिंग कॉलेज सुरु करावे अशी मागणी उबाठाने केली आहे.(Nursing College)
https://www.prahaar.in/2026/11/18/could-containers-be-used-in-parks-and-playgrounds-to-house-temporary-anganwadis-in-mumbai-a-proposal-to-this-effect-has-been-put-forward/
वांद्र्यातील भाभा रुग्णालयाजवळील मोकळ्या जागेचा विकास करून तिथे नर्सिंग कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेतल्यांनतर सार्वजनिक खाजगी सहभाग प्रोत्साहन धोरणांतर्गत (पीपीपीपी) विकसित करण्यात येत आहे. यासाठी वीएसपीएम अकॅडेमी ऑफ हायर एज्युकेशन ही संस्था पात्र ठरली असून 5.56 कोटी रुपये एवढ्या रक्कमेचे एक वेळचे उच्चत्तम अधिमूल्य आणि प्रति वर्षी 2350 रुपये वार्षिक भाडे तत्वावर ही जागा दहा वर्षांच्या कालावधीसाठी दिली जाणार आहे. बीएससी नर्सिंग कॉलेज हे मुंबईमध्ये नसल्याने हे मुंबईतील पहिले नर्सिंग कॉलेज ठरणार आहे. परंतु याला आता उबाठाने विरोध केला आहे. मागील 25 वर्षे सत्तेत बसून सेव्हन हिल्स, अंधेरीतील ब्रह्मकुमारीज यासह अनेक रुग्णालये, प्रसूतीगृहे खासगी संस्थांना आंदण दिल्यानंतर उबाठाच्या नगरसेवकांना आता अशाप्रकारे खासगी संस्थांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या विकास कामाला विरोध केला जात आहे. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या दालनात सुधार समिती सदस्य सचिन पडवळ आणि उर्मिला पांचाळ यांनी पत्रकार परिषद घेवून वांद्रे येथील भाभा कॉलेज जवळील प्रस्तावित नर्सिंग कॉलेजच्या बांधकामाला विरोध दर्शवला. आपल्याला डिप्लोमा कॉलेजची गरज नसून डिग्री कॉलेजची आवश्यकता असल्याचे पडवळ यांनी सांगितले.(Shiv Sena UBT)
तर याठिकाणी 100 विद्यार्थी नर्सिंगचे शिक्षण घेणार असून दरवर्षी 20 जागेवर महापालिका आणि 80 जागा या खासगी संस्थेच्या माध्यमातून सशुल्क भरले जाईल. या 80 जागातून संबंधित संस्था वर्षाला सव्वा कोटी रुपये कमवणार आहे. अशाप्रकारे प्रत्येक वर्षी 80 जागा भरून पाच वर्षात 12 कोटी रुपये कमावणार आहे. त्यामुळे या संस्थेला मदत करण्याचे काम प्रशासन करत असल्याचा आरोप पडवळ यांनी केला.
https://www.prahaar.in/2026/11/18/installation-of-live-kitchen-screens-made-mandatory-in-mumbai-hotels-and-restaurants/
तसेच त्यांनी कांदिवली चारकोप सेक्टर 2 मधील शाळेचा पुनर्विकास प्रकल्प राबवून सेंट मेरी स्कूल शाळा व्यवस्थापनाला मदत केला जाणार असल्याचे सांगत यालाही आपला विरोध आहे. तसेच शीव रुग्णालय ड्युअल एनर्जी सी.टी. स्कॅन सुविधासाठी खाजगी सार्वजनिक भागीदारी तत्वावर रेडीओलॉजी केंद्राची उभारणी साठी खासगी संस्थेला देण्यात येणाऱ्या प्रस्तावालाही विरोध दर्शवला. मागील 25 वर्षात जे प्रस्ताव विरोधकांच्या विरोधानंतर मंजूर करत असे प्रस्ताव मारून नेणाऱ्या उबाठाला आता असेच प्रस्ताव चुकीचे वाटू लागले आहे. सत्ता असताना डोळे बंद करून मंजूर केले जात होते आणि सत्तेपासून दूर झाल्यानंतर त्यांचे डोळे उघडले गेले,त्यामुळे त्यांचा विरोध होतो का असा प्रश्न उपस्थित होत आहे. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेत लूट सुरू असल्याचे सांगत भाजपचा विरोध असतांनाही सुधार समिती अध्यक्षा असे प्रस्ताव मंजूर करत आहे. त्यामुळे आम्ही आमची भूमिका आधीच जाहीर करत असल्याचे सांगितले.(Maharashtra Politics)