मुंबई: राज्य शासनाने तीन वरिष्ठ भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला आहे. पुन्हा एकदा काल (मंगळवार- 17 नोव्हेंबर) राज्य शासनाने प्रशासकीय यंत्रणेमध्ये फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील या तीन वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. या तिनही अधिकाऱ्यांकडे मंत्रालयातील महत्त्वाच्या विभागांची धुरा सोपवण्यात आल्याची माहिती आहे. राज्य शासनाच्या जनसंपर्क विभागाकडून ही अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणकोणत्या विभागांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे, जाणून घेऊया…
https://www.prahaar.in/2026/11/17/public-hearing-on-the-uniform-civil-code-in-mumbai-an-opportunity-for-citizens-to-express-their-views/
अतुल निळकंठ पाटणे (Atul Nilkantha Patne- IAS:RR:1999): सामान्य प्रशासन विभागात (मंत्रालय, मुंबई) प्रशासकीय नावीन्य, उत्कृष्टता आणि सुशासन विभागाचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत असलेल्या अतुल पाटणे यांची आता मंत्रालयातील वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव (Principal Secretary, Textile) म्हणून बदली करण्यात आली आहे.
शैला ए. (Shaila A- IAS:RR:2003): सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागात (मंत्रालय, मुंबई) सचिव (वस्त्रोद्योग) म्हणून कार्यरत असलेल्या शैला ए. यांची आता महिला व बालविकास विभागाच्या सचिव (Secretary, Woman & Child Welfare Department), मंत्रालयामध्ये बदली करण्यात आली आहे.
स्वाती योगेश म्हसे- पाटील (Smt. Swati Yogesh Mhase Patil- IAS:SCS:2008): यांच्या 17.08.2026 रोजीच्या पदस्थापनेच्या आदेशात काही प्रमाणामध्ये बदल करण्यात आला आहे. त्यांची आता मंत्रालयामधील सामान्य प्रशासन विभागात सचिव (प्रशासकीय नावीन्य, उत्कृष्टता आणि सुशासन) नियुक्ती करण्यात आली आहे.
https://www.prahaar.in/2026/11/18/crpf-police-ultimatum-to-surrender-issued-to-latif-bhat-the-mastermind-behind-the-kulgam-terror-attack/
मंत्रालयातील महत्त्वाच्या खात्यांना नवे सचिव
राज्य शासनाने केलेल्या बदल्यांमुळे मंत्रालयातील सामान्य प्रशासन, महिला आणि बालविकास, वस्त्रोद्योग अशा तीन महत्त्वाच्या विभागांमध्ये नवीन नेतृत्वाखाली कामकाज सुरू होणार आहे. संबंधित अधिकार्यांनी आपल्या नवीन पदाचा कार्यभार तात्काळ स्वीकारण्याचे निर्देश शासनाने दिले आहे.