Home ताज्या घडामोडी “जिवंत राहायचे असेल तर…” CRPF जवानांकडून लतीफ भटला सरेंडर होण्यासाठी अखेरचं अल्टीमेटम

“जिवंत राहायचे असेल तर…” CRPF जवानांकडून लतीफ भटला सरेंडर होण्यासाठी अखेरचं अल्टीमेटम

0
“जिवंत राहायचे असेल तर…” CRPF जवानांकडून लतीफ भटला सरेंडर होण्यासाठी अखेरचं अल्टीमेटम
CRPF जवानांकडून लतीफ भटला सरेंडर होण्यासाठी अखेरचं अल्टीमेटम फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई: दक्षिण जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलाच्या जवानांना लष्कर-ए.तैयबाचा दहशतवादी लतीफ भटला सरेंडर (आत्मसमर्पण) होण्यासाठी सांगितले आहे. परंतु तो सरेंडर होण्यासाठी तयार दिसत नाही. सुरक्षा दलाच्या जवानांनी लतीफ भटसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला आणि त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले गेले.

https://www.prahaar.in/2026/11/18/another-encounter-in-kulgam-lashkar-e-taiba-commander-latif-bhat-on-the-radar-of-security-forces/

लतीफ भट सध्या जंगलपोरा परिसरातील एका मशिदीत लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना माहिती मिळाली आहे. सुरक्षा दलाच्या जवानांकडून लतीफला आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले जात आहे, सोबतच त्याच्या अंदाधुंद आणि अचूक गोळीबार करत त्याला बाहेर काढण्याचाही प्रयत्न केला जात आहे. परंतू सुरक्षा दलाच्या जवानांकडून विशेष मेहनत घेत त्याच्यावर कारवाई केली जात आहे.राष्ट्रीय रायफल्सच्या कमांडिंग ऑफिसरने त्याला सरेंडर होण्यासाठी सांगितले असून, जर तो स्वत:हून सरेंडर झाला तर, त्याला जीवदान दिले जाईल. जर त्याला जीवनदान हवे असल्यास ही त्याच्यासाठी शेवटची संधी असेल. तथापि, लतीफ भटने, “अल्लाहशिवाय माझ्यासोबत कोणीही नाही,” असे जाहीर करून आत्मसमर्पण करण्यास स्पष्टपणे नकार दिला.

 

लतीफ भटसाठी आत्मसमर्पण करण्याची ही शेवटची संधी आहे. वास्तविक पाहता, अशा कारवायांमध्ये प्रमाणित कार्यपद्धतीचे पालन केले जाते. जेव्हा आरोपी वारंवार आत्मसमर्पण करण्यास नकार देतो, तेव्हा कारवाई सुरू केली जाते आणि गोळीबाराला गोळीबारानेच प्रत्युत्तर दिले जाते. लतीफ भट हा कुलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आहे. तपासात अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. दहशतवादी उमर निसार दार याने लष्कर-ए-तैयबाचा कमांडर लतीफ भट याच्यासोबत हल्ला करण्यापूर्वी अनेक भागांची रेकी केली होती, अशी माहिती मिळाली आहे. सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, 10 नोव्हेंबर 2026 रोजी उमर निसार दार आणि लष्कर कमांडर लतीफ भट यांनी कुलगामच्या अनेक भागांची रेकी केली होती. रेकी करतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले आहे.

https://www.prahaar.in/2026/11/18/cyclone-threat-in-the-bay-of-bengal-what-will-the-weather-be-like-in-maharashtra-today/

उमर निसार दार आणि लष्कर कमांडर लतीफ भट हे दोघेही सुरक्षा दलांवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. मीर बाजार, अखरान, हब्लिश आणि किलम यांसारख्या भागांची त्यांनी रेकी केली होती. दुसऱ्या दिवशी, 11 नोव्हेंबर रोजी, या दोघांनीही अखरानमधील सीआरपीएफच्या चौकीवर अचानक हल्ला केला आणि हल्ला केल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here