Home ब्रेकिंग न्यूज होर्मुझच्या सामुद्रधुनीत ‘तारा गॅस’ टँकरवर क्षेपणास्त्र हल्ला; 22 हून अधिक कर्मचारी सुरक्षित, आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ

होर्मुझच्या सामुद्रधुनीत ‘तारा गॅस’ टँकरवर क्षेपणास्त्र हल्ला; 22 हून अधिक कर्मचारी सुरक्षित, आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ

0
होर्मुझच्या सामुद्रधुनीत ‘तारा गॅस’ टँकरवर क्षेपणास्त्र हल्ला; 22 हून अधिक कर्मचारी सुरक्षित, आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ
होर्मुझच्या सामुद्रधुनीत 'तारा गॅस' टँकरवर क्षेपणास्त्र हल्ला

जागतिक व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) जहाजांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. 16 नोव्हेंबर रोजी झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचे लक्ष्य ठरलेल्या जहाजाची ओळख भारताने पटवली आहे. पनामा देशाचा ध्वज असलेले आणि द्रवरूप पेट्रोलियम वायू (LPG) वाहून नेणारे ‘तारा गॅस’ हे टँकर या हल्ल्याचे लक्ष्य ठरले. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मंगळवारी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. या जहाजावरील सर्व 25 कर्मचारी सुरक्षित असून, सुदैवाने या हल्ल्यात कोणालाही दुखापत झालेली नाही.

सोशल मीडियावरून माहिती जाहीर

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर पोस्ट करत जहाजाची ओळख आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची पुष्टी केली. मात्र, या पोस्टमध्ये घटनेचे नेमके ठिकाण किंवा जहाजाचे झालेले नुकसान याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. युनायटेड किंगडम मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स (UKMTO) या संस्थेने जारी केलेल्या 208-26 क्रमांकाच्या इशाऱ्यानुसार, 16 नोव्हेंबर रोजी स्थानिक वेळेनुसार रात्री 11 वाजता ओमानमधील खासाब शहराच्या उत्तरेला सुमारे 7 नॉटिकल मैल अंतरावर एका जहाजावर हल्ला झाला होता. या हल्ल्यामुळे टँकरचे नुकसान झाले असून, त्याच्या इंजिन कक्षात आग लागली होती. यूकेएमटीओने सुरुवातीला जारी केलेल्या 207-26 क्रमांकाच्या इशाऱ्यात जहाजाला अज्ञात वस्तूची धडक बसल्याचे म्हटले होते. मात्र, कोणत्याही सार्वजनिक सूचनेत जहाजाचे नाव उघड करण्यात आले नव्हते.

https://www.prahaar.in/2026/11/17/andhra-pradesh-faces-threat-of-third-cyclone-what-exactly-is-happening-in-bay-of-bengal-weather-update/

सतर्कतेचा इशारा आणि राजनैतिक घडामोडी

या गंभीर घटनेनंतर UKMTO ने चौकशी पूर्ण होईपर्यंत या सागरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व व्यावसायिक जहाजांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, हा सागरी मार्ग पूर्णपणे बंद करण्याचे किंवा जहाजांचे मार्ग बदलण्याचे कोणतेही निर्देश अद्याप देण्यात आलेले नाहीत. विशेष म्हणजे, 17 नोव्हेंबर रोजीच ओमान आणि इराण या दोन्ही देशांमध्ये सागरी मार्गांची सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय व्यापार सुरळीत ठेवण्याबाबत उच्चस्तरीय चर्चा झाली. अशा संवेदनशील आणि तणावपूर्ण वातावरणात ‘तारा गॅस’ टँकरवरील हल्ल्याची घटना समोर आल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here