'कॅप्टन कूल'चं अपूर्ण स्वप्न; आयपीएलमध्ये 'या' संघाविरुद्ध एकदाही जिंकता आले नाही!

फोटो सौजन्य :  ANI

महेंद्रसिंग धोनी हा सर्वात यशस्वी आयपीएल कर्णधारांपैकी एक आहे.

फोटो सौजन्य :  ANI

चेन्नई सुपर किंग्सला पाच वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या धोनीने 235 आयपीएल सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले.

फोटो सौजन्य :  ANI

लीगमधील जवळपास प्रत्येक मोठ्या संघाला पराभूत केले. पण कर्णधारपदाच्या कारकिर्दीत एक रंजक आकडेवारी आहे.

फोटो सौजन्य :  ANI

एक असा आयपीएल संघही आहे, ज्या संघाविरुद्ध कर्णधार म्हणून धोनीला एकही सामना जिंकता आला नाही. 

फोटो सौजन्य :  ANI

आयपीएलच्या इतिहासात गुजरात लायन्सविरुद्ध कर्णधार म्हणून एमएस धोनी एकही सामना जिंकू शकलेला नाही.

फोटो सौजन्य :  ANI

आयपीएल 2016 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखालील पुणे संघाने गुजरात लायन्सचा दोनदा सामना केला.

फोटो सौजन्य :  ANI

रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचं नेतृत्व करताना धोनीच्या संघाला दोन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. 

फोटो सौजन्य :  ANI

2017 मध्ये पुणे संघाचे कर्णधारपद स्टीव्ह स्मिथकडे सोपवण्यात आले आणि 2018 मध्ये गुजरात लायन्स संघ लीगमधून बाहेर पडला.

फोटो सौजन्य :  ANI

त्यामुळे कर्णधार म्हणून या संघांविरुद्ध धोनीच्या नावावर 0 विजय आणि 2 पराभवांची नोंद झाली.

फोटो सौजन्य :  ANI