अहिल्यानगर (प्रतिनिधी) : बुद्धिबळ खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शांतीकुमारजी फिरोदिया अखिल भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. देशभरातून २५० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत शौनक बडोले नागपूर याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला, तर श्रीराज भोसले कोल्हापूर याने द्वितीय क्रमांक मिळविला. महाराष्ट्रालाच विजेते व उपविजेतेपद मिळाल्यामुळे खेळाडूंमध्ये उत्साह होता.जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
अहिल्यानगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, एस.टी. स्टँड रोड येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे सर्वांत मोठे आकर्षण ठरले ते चीनमधून आणण्यात आलेला अत्याधुनिक बुद्धिबळ खेळणारा रोबोट. या रोबोट ने प्रत्यक्ष खेळाडूंशी बुद्धिबळा चे डाव खेळल्याने स्पर्धेला आधुनिक तंत्रज्ञानाची अनोखी जोड मिळाली. अहिल्यानगर मध्ये प्रथमच बुद्धिबळ प्रेमींना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रमानवा सोबत खेळण्याची संधी मिळाली. या रोबोट समोरही खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावत बुद्धिमत्तेची चुरस अनुभवली. अवघ्या साडेचार वर्षांच्या बाल खेळाडू पासून ते ८७ वर्षांच्या ज्येष्ठ खेळाडू पर्यंत विविध वयोगटांतील स्पर्धकांनी सहभाग घेतल्याने स्पर्धेचे स्वरूप विशेष ठरले. बक्षीस वितरण समारंभास संघटनेचे पदाधिकारी, मान्यवर, खेळाडू, पालक आणि बुद्धिबळप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
https://www.prahaar.in/2026/11/17/raids-on-country-liquor-dens-in-ahilyanagar-goods-worth-1-92-lakh-seized-cases-filed-against-4-people/
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे:
प्रथम- शौनक बडोले, द्वितीय- श्रीराज भोसले, तृतीय- हर्ष घाडगे, चतुर्थ- अडलजा वनशहा, पाचवे- मॉक्सिट शहा, सहावे- तनिष्क कुमार, सातवे- ईश्वरी जगदाळे, आठवे-सई शर्मा, नव्वे- सोहेल शेख, दहावे- ए बालकृष्णा, अकरावे- रोमित जाडे, बारावे- मोहन जाडे, तेरावे- आयुष कोटेचा, चौदावे- शुभम चांडक, पंधरावे- अमय दांडेकर,
बेस्ट १८००
प्रथम- श्रीराम म्हसणे, द्वितीय- अनय पिंपरकर, तृतीय- सानवी गोरे, चतुर्थ- कृणाल सोलंकी, पाचवे- आर्यन चाक्रबोर्थ, सहावे- जीत बोरीसा, सातवे- पंकज बोरसे, आठवे- निलनता चंदा, नव्वे- सुयोगकुमार पटेल, दहावे- प्रणव जाध्वर,
बेस्ट १६००
प्रथम- तनिष्का राठी, द्वितीय- शिवप्रसाद काळे, तृतीय- अभिजीत घाणेकर, चतुर्थ- अक्षता जैन, पाचवे- कर्सेन मनस, सहावे- कुशान चौधरी, सातवे- तनय कावळे, आठवे- व्यंकटेश करर्णव, नव्वे- कृष्णा कुलकर्णी, दहावे-किरणकुमार इंगळे,
बेस्ट अनरेटेड कॅटेगिरी
प्रथम- हरऋषिकेश राठोड, द्वितीय- जय पवार, तृतीय- अनया पिसे, चतुर्थ- सचिन देशपांडे, पाचवे- काव्या सोनेकर, सहावे- सचिन वंजारे, सातवे- अंश जोशी, आठवे- अपूर्वा फटांगरे, नव्वे- अजिंक्य क्षीरसागर, दहावे- दैविक देखणे
ज्येष्ठ सर्वोत्तम खेळाडू
प्रथम- सुनील जोशी, द्वितीय- अशोक ससाने, तृतीय- हरिहर सुब्रमण्यम, चतुर्थ- सूर्याजी भोसले, पाचवे- सखाराम सोनवणे, सहावे- पद्माकर करणकर, सातवे- देवेंद्र चांचाणी, आठवे- बलभीम कांबळे, नव्वे- लालगोविंद कोळपेकर, दहावे- नातू सोमवंशी,
उत्कृष्ट महिला खेळाडू
प्रथम- मेहेक कटारिया, द्वितीय- श्रिया हिप्परागी, तृतीय-श्रावणी आंधळे, चतुर्थ- शर्वरी देशमुख, पाचवे- लाव्या मेनोन
बेस्ट अहिल्यानगर जिल्ह्यातील खेळाडू
प्रथम- ईशान चोरडिया, द्वितीय- जिनम संकलेचा, तृतीय- हिमांशू मखीजा, चतुर्थ- अश्विन चंगेडिया, पाचवे- आर्यन देवकर
https://www.prahaar.in/2026/11/17/how-long-will-you-serve-rahul-gandhi-who-did-not-even-let-you-speak-at-delhi-rally-bjp-navnath-ban-slams-sanjay-raut/
बेस्ट अहिल्यानगर तालुक्यातील खेळाडू
प्रथम- आय्या आयुष, द्वितीय- सार्थक शिंदे, तृतीय- आदेश देखने, चतुर्थ- पार्थ झवर
बेस्ट १६ वर्षांखालील खेळाडू
प्रथम- निशांत जवळकर, द्वितीय- प्रीजेश वेलीयेतंपरमबील, तृतीय-आदिराज मेहत्रे, चतुर्थ- ओजस हिवरे, पाचवे- दिव्यान महाजन,
बेस्ट १३ वर्षांखालील खेळाडू
प्रथम- मण्या द्रोलिया, दुतीय- मारस सिंग, तृतीय- वरद पाटील, चतुर्थ- श्रीयश कुदळे, पाचवे- चाक्रबोर्टी आयन,
बेस्ट १३ वर्षांखालील खेळाडू
प्रथम- स्वराज विश्वास, दुतीय- अभेद्य दायमा, तृतीय- सोमकुवर, चतुर्थ- रूद्र, पाच- यश दामोधर,
बेस्ट १० वर्षांखालील खेळाडू
प्रथम- मनीष जावळकर, द्वितीय- दर्श राऊत, तृतीय- आण्वित गायकवाड, चतुर्थ- राहुल ढवळे, पाचवी- अनया जोशी,
बेस्ट १० वर्षांखालील खेळाडू
प्रथम-जहान गुप्ता, द्वितीय- शरवी भांगूरकर, तृतीय- आयुष घुगे, चतुर्थ- शाम प्रदीप, पाचवे- जगांक पाटील,
बेस्ट सात वर्षांखालील खेळाडू
प्रथम- दुर्वेश ठाकूर, द्वितीय- स्वराज हेंड, तृतीय- इरीशा हिरे, चतुर्थ- आशिष कुमार.