आवळामध्ये 'व्हिटॅमिन सी' आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. शरीराचे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती उत्तम राखण्यासाठी याची मदत होते.
बाजरी हे एक पौष्टिक धान्य असून हिवाळ्याच्या हंगामात याचे सेवन केले जाते. बाजरी खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेलं राहण्यास मदत होते आणि शरीराला संतुलित पोषण मिळतं.
हिवाळ्याच्या दिवसांत पालक, मेथी, यांसारख्या पालेभाज्या जास्त प्रमाणात खाव्या. या भाज्यांमधे जीवनसत्त्वं 'अ', 'क' आणि 'के' यांसोबतच फोलेट, लोह (आयर्न) आणि फायबर यांसारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात.
हिवाळ्याच्या दिवसांत गूळ खाल्ल्याने त्यातील लोह आणि अनेक खनिजांचा शरीराला उपयोग होतो.
हिवाळ्याच्या दिवसांत तीळ खाल्ल्याने हाडांच्या आरोग्यासाठी आणि संपूर्ण शारीरिक कल्याणासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.