Home क्रीडा ‘दहा वर्षानंतर विराट कोहलीला पश्चाताप होईल’, कपिल देव यांनी असं का म्हंटलं?

‘दहा वर्षानंतर विराट कोहलीला पश्चाताप होईल’, कपिल देव यांनी असं का म्हंटलं?

0
‘दहा वर्षानंतर विराट कोहलीला पश्चाताप होईल’, कपिल देव यांनी असं का म्हंटलं?
'दहा वर्षानंतर विराट कोहलीला पश्चाताप होईल', कपिल देव यांनी असं का म्हंटलं? (Photo: ANI)

विराट कोहली आणि विक्रम हे एक क्रिकेटमधील समीकरण ठरलं आहे. विराट कोहलीने काही धावा केल्या की त्याचा नावावर विक्रमांची नोंद होत असते. अशा स्थितीत विराट कोहलीने सुरुवातीला टी20 आणि त्यानंतर कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली. आंतरराष्ट्रीय पातळीवर आता फक्त वनडे क्रिकेट खेळत आहे. विराट कोहलीची कसोटी फॉर्मेटमधील निवृत्ती अनेकांना खटकली. कारण चांगल्या फॉर्मात असताना असा निर्णय घेतल्याने आश्चर्य वाटणं सहाजिकच आहे. आता माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. इतकंच काय तर कसोटीमधील निवृत्तीच्या निर्णयावर विराट कोहलीला दहा वर्षानंतर पश्चाताप होईल, असंही त्यांनी सांगितलं.

काय म्हणाले कपिल देव?

माजी क्रिकेटपटू कपिल देव म्हणाले की, कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणं ही विराट कोहलीची सर्वात मोठी चूक आहे. विराट कोहली 10 वर्षांनी जेव्हा या निर्णयावर विचार करेल तेव्हा त्याला नक्कीच पश्चाताप होईल. विराट कोहली या टप्प्यावरही एका 25 वर्षीय खेळाडूला आव्हान देऊ शकला असता. पण त्याने रागाच्या भरात निवृत्ती घेणं योग्य नाही. कपिल देव यांनी सांगितलं की, ‘माझ्या नजरेत विराट कोहलीने कसोटीतून निवृत्ती घेऊन मोठी चूक केली आहे. त्याला दहा वर्षांनी या निर्णयाचा पश्चाताप होईल. त्याने निवृत्ती घ्यायला नको होती. कोहलीकडे जबरदस्त फिटनेस आहे आणि अन्य खेळाडूंच्या तुलनेत त्याची फिटनेस लेव्हल वेगळी आहे.’

https://www.prahaar.in/2026/11/17/sunrisers-hyderabad-opener-travis-head-will-not-play-in-the-2027-ipl-tournament/

रागाच्या भरात निर्णय घेणं योग्य नाही…!

माजी क्रिकेटपटू कपिल देव म्हणाले की, ‘रागाच्या भरात निवृत्तीचा निर्णय घेणं योग्य नाही. त्याने मोहिंदर अमरनाथसारखं असलं पाहीजे, त्याला अनेकदा संघातून ड्रॉप केलं गेलं. पण त्याने पुनरागमन करून सर्वांना चुकीचं ठरवलं.’ कपिल देव यांनी पुढे सांगितलं की, ‘जर तो खेळू शतक असले तर चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी (निवडकर्त्यांनी) निर्णय घेतला तर त्याचं करिअर संपेल. मी ही बाब निवडकर्त्यांवर सोडतो. कारण ते भारताच्या चांगल्यासाठी निर्णय घेतील.’ कपिल देव यांनी रोहित शर्माबाबत सांगितलं की, सचिन तेंडुलकर असो की धोनी किंवा गावस्कर हे सर्व खेळाडू निवृत्त झाले आहेत. त्याच प्रमाणे रोहित शर्माच्या करिअरचा एक दिवस शेवट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here