Udaipur Viral Video: उदयपूरमधून एका थाई-फ्रेंच यूट्यूबरने रात्रीच्या लाईव्हस्ट्रीममध्ये घडलेल्या घटनेमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. कारण या कंटेंट क्रियेटरने नकार देऊनही एका व्यक्तीने तिच्याकडे वारंवार चुंबनाची मागणी केली. यावर आता त्या व्यक्तीने पुढे येऊन माफी मागितली आहे. तसेच स्वतःचे नाव आफताब असल्याचे सांगून, त्याने आपली चूक मान्य केली, आपल्या वर्तनाबद्दल त्याला लाज वाट असल्याचे त्याने सांगितले आहे. तसेच महिला व बाहेरून आलेल्या पाहुण्यांचा आदर करण्याचे आवाहन केले आहे.
नेमकं प्रकरण काय?
राजस्थानमधील उदयपूर येथे एका गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी यूट्यूबर जस्टकेथच्या रात्रीच्या लाईव्हस्ट्रीम दरम्यान स्ट्रीमर तिच्या दर्शकांशी संवाद साधत होती. यावेळी एक व्यक्ती तिच्याजवळ आला आणि त्याने एक विचित्र मागणी केली. “एक चुंबन, प्लीज. ओठांवरचं एक चुंबन,” असे तो माणूस तिला म्हणाला. यावर जस्टकेथने ताबडतोब नकार दिला, आणि तिला त्यात रस नाही हे स्पष्ट केले. तरीही, तिने वारंवार नकार देऊनही तो माणूस विचारतच राहिला. त्या संवादादरम्यान तिच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून असे दिसत होते की, त्याच्या सततच्या मागण्यांमुळे तिला अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर शेवटी त्या माणसाने अखेरीस आपली मागणी बदलून त्याऐवजी तिला फोटो काढायला सांगितले. त्यानंतर फोटो काढून झाल्यानंतर शेवटी तो निघायच्या तयारीत असताना, त्याने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला, पण त्या यूट्यूबरने मुठीने टाळी देऊन प्रतिसाद दिला. हा सर्व प्रकार तिच्या लाईव्हस्ट्रीम मध्ये चित्रित झाला आणि नंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. इन्स्टाग्रामवर ही क्लिप शेअर करताना, जस्टकेथने त्याला ‘किमान त्याने विचारले तरी’ असे कॅप्शन देत पोस्ट केले.
View this post on Instagram
पाच दशलक्ष होऊन अधिक व्ह्यूज या व्हिडिओने ओलांडले. या व्हिडिओमुळे संमती, वैयक्तिक मर्यादा आणि भारतात प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेविषयी पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. यावर आता त्या व्यक्तीने माफी मागितली असून आपल्याला ‘खूप लाज वाटत आहे’ असे म्हटले आहे. जस्टकेथने तो तिच्या इंस्टाग्राम आणि यूट्यूबसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला. त्यानंतर ही क्लिप ऑनलाइन व्हायरल झाली, ज्यात अनेक वापरकर्त्यांनी त्या व्यक्तीच्या वर्तनावर टीका केली आणि महिलांना, विशेषतः एकट्याने प्रवास करणाऱ्या परदेशी पर्यटकांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल चिंता व्यक्त केली.
View this post on Instagram
व्यक्तीने मागितली माफी
लाईव्हस्ट्रीम दरम्यान थाई-फ्रेंच यूट्यूबर आणि आयआरएल स्ट्रीमर जस्टकेथचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही दिवसांनी, त्या व्यक्तीने पुढे येऊन माफी मागितली आहे. त्यात त्याने स्वतःचे नाव आफताब असल्याचे सांगून, आपली चूक मान्य केली, तसेच आपल्या वर्तनाबद्दल लाज वाटत असल्याचे सांगितले आणि लोकांना महिला व बाहेरून आलेल्या पाहुण्यांचा आदर करण्याचे आवाहन केले.
https://www.prahaar.in/2026/11/17/rs-15-lakh-fund-for-every-gram-panchayat-in-the-state-for-drought-relief/
सोशल मीडियावर फिरत असलेल्या माफीच्या व्हिडिओमध्ये, आफताबने सांगितले की, सूरजपोल पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटक देखील करण्यात आली आहे. बोलताना कान धरून त्याने वारंवार माफी मागितली आहे आणि पुन्हा असे वर्तन करणार नाही असे सांगितले.
“माझं नाव आफताब, माझ्या वडिलांचं नाव अबरार खान आणि मी पाटण तहसीलच्या काली मूर्तीचा रहिवासी आहे. काही महिन्यांपूर्वी माझ्याकडून एक चूक झाली, ज्यावरून सूरजपोल पोलीस ठाण्यात माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मी केलेल्या चुकीची मला खूप लाज वाटते. आपण बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांचा आणि महिलांचा आदर केला पाहिजे,” असे तो या व्हिडिओमध्ये म्हणाला. त्याने पुढे इतरांनाही असे वर्तन न करण्याचे आवाहन केले आणि आपल्या कृत्याची आपल्याला अत्यंत लाज वाटत असल्याचे सांगितले.