Janak Marathi Movie: अभिनेत्री सायली संजीवची मुख्य भूमिका असलेला ‘जनक’ हा चित्रपट 13 नोव्हेंबर 2026 रोजी रिलीज होणार होता. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक होते. मात्र, हा चित्रपट रिलीज झालाच नाही. या चित्रपटाचं काय झालं? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. अखेर या चित्रपटाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
जनक हा मराठी चित्रप एक कोर्टरूम ड्रामा आहे. सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट बाप-लेकीच्या नात्याचा प्रवास आणि स्वाभिमानासाठी पेटलेल्या लढ्याची कहाणी सांगतो. ज्या बापाने लेकीसाठी आयुष्यभर आभाळाएवढं प्रेम दिलं, त्याच बापावर जेव्हा आरोपांचं सावट येतं, तेव्हा त्याच्या सन्मानासाठी लेकच ढाल बनून उभी ठाकते. अशा संघर्षातून उलगडणारा ‘जनक’ हा केवळ बाप-लेकीच्या नात्याचा प्रवास नाही, तर स्वाभिमानासाठी पेटलेल्या लढ्याची कहाणी आहे. सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट सिनेप्रेमींच्या भेटीला का आला नाही?
या कोर्टरूम ड्रामामध्ये अविनाश नारकर, सायली संजीव आणि सुरेश विश्वकर्मा हे मुख्य भूमिकांमध्ये आहेत. त्याचबरोबर विनिता काळे, अनुष्का पिंपुटकर, ओंकार भसमे, प्रसाद ओझरकर यांच्यासह अनेक नामवंत मराठी कलाकार सिनेमात आहेत.
आर. टी. बी. फिल्म्स निर्मित आणि अभिषेक कंवर दिग्दर्शित सायली संजीवचा हा चित्राप्त 13 नोव्हेंबर 2026 रोजी रिलीज होणार होता. पण तो थिएटरला आलाच नाही. त्यामागील कारण असे की, चित्रपटाला थिएटर मिळत नसल्याने निमार्त्यांनी चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मात्यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत हे जाहीर केलं आहे.
https://www.prahaar.in/2026/11/16/amitabh-bachchan-news-police-foil-plot-to-open-fire-outside-amitabh-bachchans-residence-jalsa-two-arrested/
आरटीबी, अभिषेक कंवर, सुरेश विश्वकर्मा, अविनाश नारकर आणि अनुष्का पिंपुटकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करून सांगितलं आहे.
View this post on Instagram
सोशल मीडिया पोस्ट
चित्रपटगृहांची उपलब्धता नसल्यामुळे आणि तुमच्याकडून मिळालेल्या अफाट प्रेम व प्रतिसादाचा विचार करता, आम्ही जनकच्या चित्रपटगृहातील प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तुमचे प्रेम, विश्वास आणि पाठिंबा हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे. आमचा ठाम विश्वास आहे की ‘जनक’ सारखा चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हवा आणि त्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत. जनक फेब्रुवारी 2027 पर्यंत चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित होईल. पूर्वीपेक्षा अधिक भव्य, अधिक प्रभावी आणि अधिक नेत्रदीपक स्वरूपात! तुमच्या संयमाबद्दल, प्रेमाबद्दल आणि खंबीर पाठिंब्याबद्दल धन्यवाद. 2027 मध्ये भेटूया! असं या पोस्टमध्ये लिहिले आहे.