मुंबई : मुंबईच्या बॅलार्ड इस्टेट भागात सोमवारी सकाळी एक अतिशय सुंदर आणि न विसरता येण्यासारखा प्रसंग पाहायला मिळाला. ब्रिटनचे प्रिन्स विल्यम (Prince Villiam) आणि प्रिन्सेस कॅथरीन ( Princess Kate ) यांनी भारताचे क्रिकेट सम्राट सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्यासोबत मुंबईतील शाळकरी मुलांबरोबर ‘गल्ली क्रिकेट’ खेळण्याचा आनंद घेतला. हा खास कार्यक्रम आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि वसुंधरेबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.
क्रिकेटच्या मैदानावरील धमाल क्षण

मजेशीर गप्पा आणि मार्गदर्शनाचे क्षण

https://www.prahaar.in/2026/11/16/one-person-arrested-for-uploading-objectionable-photos-of-an-actress-on-social-media-action-taken-by-bandra-police/
कोणाचा पोशाख कसा होता ?
या खास कार्यक्रमात या सर्वच दिग्गजांच्या पेहरावाचीही बरीच चर्चा रंगली होती.
प्रिन्स विल्यम : यांनी पांढऱ्या रंगाचा शर्ट, त्यावर गडद निळ्या रंगाचे नेहरू जॅकेट आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली होती.
प्रिन्सेस कॅथरीन : यांनी पांढऱ्या रंगाच्या टॉपवर फिकट लाईम-ग्रीन रंगाचा सुंदर ब्लेझर आणि मॅचिंग पँट घालीत अतिशय आकर्षक लूक केला होता.
सचिन तेंडुलकर : आपले लाडके ‘मास्टर ब्लास्टर’ नेहमीप्रमाणेच एकदम स्मार्ट आणि कॅज्युअल लूकमध्ये दिसले. त्यांनी गडद निळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स घातली होती, ज्यामुळे त्यांचा हा अंदाज खूपच खुलून दिसत होता. या मुलांसोबत आणि क्रिकेटच्या महान खेळाडूंसोबत वेळ घालवून ब्रिटीश शाही जोडप्याने मुंबईच्या या भेटीची सुरुवात अत्यंत संस्मरणीय केली.