Home महाराष्ट्र नाशिक Nashik : नाशिकमध्ये आजपासून 65 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा, 23 नाट्यप्रयोगांची मेजवानी

Nashik : नाशिकमध्ये आजपासून 65 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा, 23 नाट्यप्रयोगांची मेजवानी

0
Nashik : नाशिकमध्ये आजपासून 65 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा, 23 नाट्यप्रयोगांची मेजवानी

नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या नाशिक केंद्राची प्राथमिक फेरी सोमवार, १६ नोव्हेंबरपासून प. सा. नाट्यगृहात सुरू होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नाशिककरांना तब्बल २३ नाट्यप्रयोगांचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. दररोज सायंकाळी ७ वाजता नाटकांचे प्रयोग सादर केले जाणार आहेत.

सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या नियोजनानुसार या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक केंद्राच्या प्राथमिक फेरीत नाशिकसह धुळे आणि इंदूर येथील एकूण २३ नाट्यसंस्था सहभागी होणार आहेत. स्पर्धेत सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक तसेच समकालीन विषयांवर आधारित नाटकांचे सादरीकरण होणार आहे. त्यामुळे नाट्यरसिकांना विविध नाट्यशैली, वेगवेगळ्या कथावस्तू आणि नवोदित कलाकारांच्या अभिनयकौशल्याचा अनुभव घेता येणार आहे.

नाट्यरसिकांसाठी कलाविष्काराची पर्वणी

यंदाच्या स्पर्धेत वैविध्यपूर्ण विषयांवरील नाटकांचा समावेश करण्यात आला आहे. सहभागी २३ नाट्यसंस्था आपापल्या कलाकृतींच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांना रंगमंचावर मांडणार आहेत. कलाकारांची मेहनत, प्रतिभा आणि सर्जनशीलता अनुभवण्याची ही नाशिककरांसाठी उत्तम संधी ठरणार आहे. नाट्यरसिकांनी या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्पर्धा समन्वयक राजेश जाधव यांनी केले आहे.

https://www.prahaar.in/2026/11/16/nashik-crimein-yeola-a-locked-house-was-broken-into-and-valuables-worth-12-lakh-99-thousand-rupees-were-stolen-including-23-tolas-of-gold-cash-and-more/

६५ व्या नाट्यस्पर्धेचे नाटकनिहाय वेळापत्रक

स्थळ : प. सा. नाट्यगृह, नाशिक

प्रयोगाची वेळ : दररोज सायंकाळी ७ वाजता

नाटकांचे वेळापत्रक

१६ नोव्हेंबर- अनुभव मंटप, १९ नोव्हेंबर- केअरटेकर, २२ नोव्हेंबर- मृत्यू आधीच आला होता, २५ नोव्हेंबर- काळवेळ, २८ नोव्हेंबर- एक्सपायरी डेट, १ डिसेंबर-बेंच आणि बरेच काही, ४ डिसेंबर -हमीदाबाईची कोठी, ७ डिसेंबर – आता कुठे धाबे मन, १७ नोव्हेंबर – पिवळी भिंत, २० नोव्हेंबर- खेळ, २३ नोव्हेंबर- सव्वा जुडूम, २६ नोव्हेंबर- आमचा काळ मस्त होता, २९ नोव्हेंबर- श्याम तुझी ऑस इली रे, २ डिसेंबर- नेटवर्क प्रॉब्लेम, ५ डिसेंबर- रघुनाट्य ब्लॉगस्पॉट, ८ डिसेंबर- लेडिज सायकल, १८ नोव्हेंबर- दाह, २१ नोव्हेंबर-शेवंता जिती हाय, २४ नोव्हेंबर – एक धुरंधर तीन बलंदर, २७ नोव्हेंबर – काळीबंद पाऊस, ३० नोव्हेंबर- द रेड पेन ड्राइव्ह, ३ डिसेंबर- मेले कोण, ६ डिसेंबर- नथिंग टू से.

नाट्यप्रेमींना विविध विषयांवरील दर्जेदार नाट्यप्रयोग पाहण्याची संधी या स्पर्धेमुळे उपलब्ध होणार असून, नाशिकच्या सांस्कृतिक वातावरणात या नाट्यमहोत्सवामुळे रंगत येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here