Home ताज्या घडामोडी ब्रिटनचे प्रिन्स विलियम आणि त्यांची पत्नी प्रिंसेस केट मिडलटन यांच्या भारत दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतुकीमध्ये बदल

ब्रिटनचे प्रिन्स विलियम आणि त्यांची पत्नी प्रिंसेस केट मिडलटन यांच्या भारत दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतुकीमध्ये बदल

0
ब्रिटनचे प्रिन्स विलियम आणि त्यांची पत्नी प्रिंसेस केट मिडलटन यांच्या भारत दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतुकीमध्ये बदल
ब्रिटनचे प्रिन्स विलियम आणि त्यांची पत्नी प्रिंसेस केट मिडलटन यांच्या भारत दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतुकीमध्ये बदल फोटो सौजन्य: ANI News

मुंबई: ब्रिटनचे प्रिन्स विलियम (Prince William) आणि त्यांची पत्नी प्रिंसेस केट मिडलटन (Kate Middleton) हे पुढच्या तीन दिवसांसाठी भारत दौऱ्यांवर येणार आहे. त्यांच्या मुंबई दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. मुंबईतील अनेक प्रमुख रस्ते यावेळी बंद ठेवण्यात येणार असून मुंबईकरांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. वाहतूक पोलिसांनी रविवारी दक्षिण मुंबईच्या काही भागांमध्ये 16 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान वाहतुकीमध्ये बदल, वाहतुकीसाठी रस्ते बंद आणि काही रस्त्यांवर पार्किंगचे निर्बंध लागू करण्यात आल्याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी आज दिली आहे.

https://www.prahaar.in/2026/11/15/shahapur-sapo-observatory-maharashtra-dark-sky-zone-in-thane-district/

16 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान ब्रिटनचे प्रिन्स विलियम आणि त्यांची पत्नी प्रिंसेस केट मिडलटन मुंबईमध्ये भारत दौऱ्यासाठी येणार आहेत. ब्रिटनचे प्रिन्स विलियम आणि त्यांची पत्नी प्रिंसेस केट मिडलटन यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईमध्ये वाहतुकीसंबंधित निर्बंध लादण्यात आले आहेत. यावेळी ते मुंबईमध्ये ते अर्थशॉट प्राईज समिट आणि अवॉर्ड्स नाईटमध्ये सहभागी होणार आहेत. मोटार वाहन कायद्यांतर्गत पोलीस उपआयुक्त (दक्षिण मुंबई वाहतूक) हेमराजसिंग राजपूत यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, वाहतूक कोंडी रोखणे आणि वाहनांचा सुरळीत प्रवाह सुनिश्चित करणे हा या निर्बंधांचा उद्देश आहे, मात्र रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस आणि इतर आपत्कालीन वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे.

https://www.prahaar.in/2026/11/15/thane-district-revenue-servant-kotwal-recruitment-exam-revised-timetable-announced/

अधिसूचनेनुसार, सोमवारी विशिष्ट मार्गांवर वाहतूक नियम लागू केले जातील. हुतात्मा राजगुरु चौकाजवळील मॅडम कामा रोडवरून फ्री प्रेस रोडकडे जाणाऱ्या वाहनांना उजवे वळण घ्यावी लागणार आहे. तसेच त्याच जंक्शनवरील फ्री प्रेस नॉर्थबाउंड रोडवरून फ्री प्रेस रोड साऊथबाउंडकडे जाणारे यू- टर्न हे दोन्ही मार्ग सामान्य वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. ते केवळ व्हीआयपींना घेऊन जाणाऱ्या वाहनांसाठी खुले राहतील. शहीद भगत सिंग मार्गाकडून अवतारसिंग बेदी चौकाकडे जाणाऱ्या वाहतुकीला वालचंद हिराचंद मार्गावर किंवा बॅलार्ड पिअर उतरण्याच्या ठिकाणाकडे उजवीकडे वळण्याची परवानगी दिली जाणार नाही. हा मार्ग केवळ व्हीव्हीआयपींच्या ताफ्यांसाठी खुला राहील. याव्यतिरिक्त, एन. मोरारजी रस्ता सर्वसाधारण उत्तर- दक्षिण मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहील.

https://www.prahaar.in/2026/11/15/threat-to-blow-up-csmt-railway-station-once-again-intensive-search-operation-underway-by-the-police/

वाहतुकीसोबतच, पोलिसांनी ‘पे-अँड-पार्क’ सुविधा सुद्धा पुढचे दोन ते तीन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण मुंबईतील अनेक रस्त्यांवर कडक पार्किंग बंदी लागू केली आहे. विनय के शाह मार्ग (एनसीपीए चौक ते मुरली देवरा चौक) आणि दोराबजी टाटा रोड (गेंडा पॉईंट ते मुरली देवरा चौक) या मार्गांवर पे-अँड-पार्क सुविधा 24 तासांसाठी बंद राहणार आहे. सोमवारी, एन मोरारजी रोड, जेएन हेरेडिया मार्ग आणि वालचंद हिराचंद मार्गावर पार्किंगला सक्त मनाई असेल. वाहनचालकांना त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करण्याचा आणि पुढील चार दिवसांत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असेही वाहतूक अधिकार्‍यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here