Home ताज्या घडामोडी राज्यातील प्रत्येक खेड्यापाड्यातील दारात आता आरोग्यसेवा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’चे उद्घाटन

राज्यातील प्रत्येक खेड्यापाड्यातील दारात आता आरोग्यसेवा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’चे उद्घाटन

0
राज्यातील प्रत्येक खेड्यापाड्यातील दारात आता आरोग्यसेवा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’चे उद्घाटन
राज्यातील प्रत्येक खेड्यापाड्यातील दारात आता आरोग्यसेवा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’चे उद्घाटन फोटो सौजन्य: प्रहार न्यूज

मुंबई: गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. आता डोंगराळ आणि वाडी- वस्त्यांवर राहणाऱ्या आदिवासी बांधवांना उपचारासाठी मैलोनमैल लांब प्रवास करण्याची गरज उरलेली नाही. कारण, थेट त्यांच्या गावातच आधुनिक आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज बहुप्रतिक्षित ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’ (फिरते रुग्णालय) प्रकल्पाचे शानदार उद्घाटन करण्यात आले आहे.

https://www.prahaar.in/2026/11/15/shahapur-sapo-observatory-maharashtra-dark-sky-zone-in-thane-district/

भौगोलिक अडचणी आणि विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत दळणवळण ठप्प झाल्यामुळे अनेक गावांमध्ये आरोग्य सुविधा पोहोचवणे अत्यंत कठीण जात होते. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेकदा नागरिकांचे प्राण धोक्यात येत असत. हीच गंभीर समस्या ओळखून जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत हा क्रांतिकारी प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यात आला आहे. यासाठी तब्बल 4 कोटी 99 लाख रुपयांचा मोठा निधी खर्च करून फिरते रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.

या फिरत्या रुग्णालयामध्ये अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची फौज असणार आहे. हे रुग्णालय एका निश्चित वेळापत्रकानुसार दुर्गम गावांमध्ये जाऊन नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार, आवश्यक वैद्यकीय चाचण्या आणि थेट औषधवाटप करणार आहे. विशेषतः माता व बाल आरोग्य, कुपोषण, हिवताप आणि क्षयरोग (TB) यांसारख्या गंभीर आजारांचे लवकर निदान करून वेळीच योग्य उपचार देण्यावर या मोहिमेत विशेष भर दिला जाणार आहे. जर एखाद्या रुग्णाची प्रकृती अधिक गंभीर असेल, तर त्याला तातडीने नजीकच्या मोठ्या रुग्णालयात हलवण्यासाठीही यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

https://www.prahaar.in/2026/11/15/major-fire-at-panvels-steel-market-massive-explosion-of-a-drum-of-thinner-firefighter-injured/

फक्त फिरते रुग्णालयच नव्हे, तर दुर्गम भागात 24 तास आपत्कालीन सेवा देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांसह सुसज्ज रुग्णवाहिका सेवेसाठी अतिरिक्त 1 कोटी 63 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशा प्रकारे या संपूर्ण आरोग्य प्रकल्पासाठी तब्बल 6 कोटी 62 लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे गडचिरोलीच्या खनिज बाधित क्षेत्रातील आरोग्य यंत्रणेचा कायापालट होणार आहे.

गेल्या अनेक दशकांपासून दळणवळणाच्या आणि आरोग्याच्या सुविधांपासून वंचित असलेल्या गडचिरोलीतील आदिवासी बांधवांसाठी हा प्रकल्प खऱ्या अर्थाने वरदान ठरणार असून, उपचारासाठी होणारा खर्च आणि वेळ यामुळे मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here