Home क्रीडा पाकिस्तानी फॅन्सही ओरडले ‘सेहवाग-सेहवाग’! 338 धावांचा थरारक पाठलाग आणि आर्यवीरचा वडिलांना भावनिक व्हिडीओ कॉल, पहा काय घडलं!

पाकिस्तानी फॅन्सही ओरडले ‘सेहवाग-सेहवाग’! 338 धावांचा थरारक पाठलाग आणि आर्यवीरचा वडिलांना भावनिक व्हिडीओ कॉल, पहा काय घडलं!

0
पाकिस्तानी फॅन्सही ओरडले ‘सेहवाग-सेहवाग’! 338 धावांचा थरारक पाठलाग आणि आर्यवीरचा वडिलांना भावनिक व्हिडीओ कॉल, पहा काय घडलं!
आर्यवीरचा वडिलांना भावनिक व्हिडीओ कॉल

Aryavir Sehwag Viral Video : अंडर 19 आशिया कपच्या थरारक अंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने पाकिस्तानचा पराभव करत ऐतिहासिक जेतेपद पटकावले. भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याचा मोठा मुलगा आर्यवीर सेहवाग याने संपूर्ण स्पर्धेत आपल्या बॅटने जबरदस्त छाप सोडली. अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर 338 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. मात्र, भारतीय संघाने शेवटच्या बॉलवर चौकार ठोकत 1 गडी राखून हा रोमांचक सामना खिशात घातला. या ऐतिहासिक विजयानंतर आर्यवीरने वडील वीरेंद्र सेहवाग यांना व्हिडीओ कॉल करून सामन्याचा थरार सांगितला.

‘डॅड, मी खूप अस्वस्थ होतो… फक्त सीता राम जप करत होतो’

वीरेंद्र सेहवागने आपल्या मुलासोबतच्या या खास संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये आर्यवीर सांगतो की, अंतिम क्षणी तो ड्रेसिंग रूममध्ये अत्यंत अस्वस्थ होऊन बसला होता आणि केवळ ‘सीता राम, सीता राम’ असा जप करत होता. गोलंदाजांनी फलंदाजीला येऊन शेवटच्या ओव्हरमध्ये सामना जिंकवून दिल्याचे त्याने सांगितले. सेहवागने या व्हिडीओला भावूक कॅप्शन देत लिहिले की, “असे क्षण पुरस्कार आणि ट्रॉफींपेक्षाही मोठे असतात. तू नेहमी जमिनीवर पाय घट्ट रोवून ठेव आणि मेहनतीने यशाची शिखरे गाठ.”

https://www.prahaar.in/2026/11/15/ind-vs-nz-5th-odi-fielding-king-virat-kohli-makes-big-mistake-drops-easy-catch-gautam-gambhir-furious/

पाकिस्तानी स्टँडमधून ‘सेहवाग-सेहवाग’चा जयघोष

आर्यवीरने स्टेडियमवरचा एक खास किस्साही वडिलांना ऐकवला. तो म्हणाला की, फलंदाजी करताना त्याला दुखापत झाली होती, तेव्हा पाकिस्तानी स्टँडमधील प्रेक्षकही ‘सेहवाग-सेहवाग’ ओरडत त्याला प्रोत्साहन देत होते. दुखापतीच्या एक्स-रेसाठी आपण उद्या घरी येत असल्याचेही त्याने सांगितले. दरम्यान, ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरलेल्या आर्यवीरने स्पर्धेतील 5 सामन्यांत 1 शतक आणि 3 अर्धशतकांसह एकूण 361 धावा कुटल्या, ज्यात अंतिम सामन्यातील 61 चेंडूंतील 58 धावांच्या महत्त्वपूर्ण खेळीचाही समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here