Home मनोरंजन Gurpreet Ghuggi on Love Gill: बिग बॉस 20 मधील लव्ह गिलबद्दल विचारताच गुरप्रीत गुग्गी काय म्हणाले ते पहाच…

Gurpreet Ghuggi on Love Gill: बिग बॉस 20 मधील लव्ह गिलबद्दल विचारताच गुरप्रीत गुग्गी काय म्हणाले ते पहाच…

0
Gurpreet Ghuggi on Love Gill: बिग बॉस 20 मधील लव्ह गिलबद्दल विचारताच गुरप्रीत गुग्गी काय म्हणाले ते पहाच…

पंजाबी अभिनेत्री लव्ह गिल सध्या बिग बॉस 20 मध्ये दिसत असून ती चांगलीच चर्चेत आहे. शोमध्ये आल्यापासून तिच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी शोमध्ये तिचा भावनिक क्षण पाहायला मिळाला होता, त्यानंतर पंजाबी अभिनेते गुरप्रीत गुग्गी यांच्याशी तिच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली होती. पंजाबी चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. त्यावेळी दोघांमध्ये कथित नाते असल्याच्या, तसेच इतर काही खाजगी गोष्टींबद्दल सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या होत्या. मात्र लव्ह आणि गुरप्रीत या दोघांनीही या सर्व गोष्टींना खोटे ठरवले होते. आता पुन्हा एकदा गुरप्रीत यांना लव्हबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी थेट उत्तर देणे टाळले.

एका पत्रकाराने गुरप्रीत यांना लव्ह गिलच्या बिग बॉस 20 मधील सहभागाबद्दल विचारले. यावर गुरप्रीत यांनी स्पष्ट सांगितले की, ते हा शो पाहतच नाहीत. त्यांनी लव्हशी संबंधित प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी पंजाबमधील मुद्द्यांवर बोलणे पसंत केले. ते पंजाबीमध्ये म्हणाले की, मी तो शो पाहत नाही. तो शो माझ्यासाठी महत्त्वाचा नाही. समाजात त्यापेक्षा मोठे मुद्दे आहेत, ज्यावर बोलायला हवे. पंजाबमध्ये शांतता असावी, प्रत्येकाला प्रेम आणि सन्मान मिळावा आणि पंजाबमधील प्रत्येक व्यक्तीला पुढे जाण्याची संधी मिळावी.

https://www.prahaar.in/2026/11/14/romantic-hero-to-now-take-on-a-horror-role-varun-dhawans-new-film-announced/

याआधी लव्ह गिलने बिग बॉसच्या घरात आपल्या आयुष्यातील अडचणींबद्दल अप्रत्यक्षपणे भाष्य केले होते. त्यावेळी स्काऊट ओपी यांची मैत्रीण काश्वी शोमध्ये आली होती. त्यानंतर लव्हने सांगितले होते की, ती आधीपासूनच खूप अडचणींमधून जात आहे आणि आता तिचे आयुष्य आणखी खराब झाले आहे. यानंतर सोशल मीडियावर गुरप्रीत यांच्यासोबतच्या तिच्या नात्याची चर्चा पुन्हा सुरू झाली. 55 वर्षीय पंजाबी अभिनेत्याने याआधी या बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचे सांगितले होते. आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. याविरोधात कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here