Home क्रीडा U19 Asia Cup 2026: भारताच्या 252 धावांवर 8 विकेट आणि 86 धावांची गरज! पाकिस्तानला 51 चेंडूत अशी दिली मात

U19 Asia Cup 2026: भारताच्या 252 धावांवर 8 विकेट आणि 86 धावांची गरज! पाकिस्तानला 51 चेंडूत अशी दिली मात

0
U19 Asia Cup 2026: भारताच्या 252 धावांवर 8 विकेट आणि 86 धावांची गरज! पाकिस्तानला 51 चेंडूत अशी दिली मात
काही क्षण इतके जादुई असतात की ते खरे वाटतच नाहीत; हा क्षणही असाच एक आहे. मोहित उल्वाला इतर खेळाडूंनी खांद्यावर घेत त्याचे कौतुक करताना दिसत आहेत. दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या या खेळाडूने २६ चेंडूंत नाबाद ४९ धावांची खेळी करत, भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यात एक अविश्वसनीय विजय मिळवून दिला आहे!

अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत झाली. हा सामना हायव्होल्टेज होणार यात काहीच शंका नव्हती. अगदी धाकधूक वाढेल असा सामना झाला. हा सामना खरं तर सुरूवातीपासून पाकिस्तानच्या बाजूने झुकलेला होता. नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली. तसेच 50 षटकात 9 गडी गमवून 337 धावांचा डोंगर उभा केला. भारतासमोर विजयासाठी 337 धावांचं कठीण आव्हान होतं आणि ही धावसंख्या गाठेल का? हा प्रश्न होता. त्यामुळे भारताला सुरूवातीपासून आक्रमक सुरुवात करण्याशिवाय पर्याय नव्हता. कर्णधार लक्ष्य रायचंदानी आणि आर्यवीर सेहवागने आश्वासक सुरूवात करून दिली. पण ही जोडी फुटली आणि सर्व काही विस्कटलं. भारताचे एका पाठोपाठ एक धडाधड विकेट पडल्या. भारताच्या 8 विकेट या 252 धावांवर पडल्या होत्या. त्यामुळे पुढे विजय होईल असं अजिबात वाटलं नाही. कारण शेपटाचे फलंदाज 51 चेंडूत 86 धावा करतील का? याबाबत शंका होती. पण मनल चौहान आणि मोहित उलवा यांनी हे सर्व अंदाज फोल ठरवले.

भारताच्या पारड्यात कसा पडला सामना?

भारतीय संघाला सातवा धक्का 251 धावांवर बसला, त्यानंतर लगेचच म्हणजे 252 धावांवर आठवी विकेट पडली. त्यानंतर नवव्या विकेटसाठी मनल चौहान आणि मोहित उलवा ही जोडी मैदानात होती. या जोडीने 35 चेंडूत 57 धावांची भागीदारी केली. मनल चौहान 32 चेंडूत 47 धावा करून बाद झाला. त्यामुळे भारतीय संघावर पुन्हा दडपण वाढलं. 16 चेंडूत भारताला 29 धावांची गरज होती आणि शेवटची विकेट हातात होती. चिगुरूपती वेंकटा मैदानात आला होता. शेवटची विकेट असल्याने आणि सामना जिंकावा यासाठी क्रीडाप्रेमींनी देवाचा धावा सुरू केला होता.  मोहित उलवा चांगला खेळत होता, पण त्याला वेंकटा साथ देईल का? हा प्रश्न होता. पण पुढे 16 चेंडूचा थरार भारतीय क्रीडाप्रेमींनी अनुभवला. प्रत्येक चेंडूवर भारतीय संघाची धाकधूक वाढली होती. इतकंच शेवटच्या चेंडूवर भारताला विजयासाठी 3 धावांची गरज होती. या चेंडूवर मोहित उलवाने चौकार मारला आणि भारताला विजय मिळवून दिला.

https://www.prahaar.in/2026/11/14/india-wins-u19-asia-cup-2026-final-on-the-very-last-ball-settles-scores-with-pakistan/

शेवटच्या षटकात 8 धावांची गरज आणि…

मोहित उलवा शेवटच्या षटकात स्ट्राईकला होता. पहिलाच चेंडू निर्धाव गेला आणि पाकिस्तानकडून स्टम्पिंगसाठी जोरदार अपील करण्यात आलं. सुदैवाने मोहित उलवा वाचला आणि भारताच्या आशा पल्लवित झाल्या. त्यानंतर चेंडू वाइड पडला आणि 5 चेंडूत 7 धावा अशी स्थिती आली. मोहितने दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली आणि वेंकटाला स्ट्राईक दिली. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर वेंकटाने एक धाव घेत मोहितला स्ट्राईक दिली. तीन चेंडू आणि 5 धावा अशी स्थिती आली. मोहितने पुन्हा एक धाव काढली आणि वेंकटा स्ट्राईकवर आली. आता दोन चेंडूत 4 धावा अशी स्थिती आली. त्यामुळे भारतासाठी करो या मरोची स्थिती होती. पाचव्या चेंडूवर वेंकटाने एक धाव काढली आणि 1 चेंडूवर 3 धावा अशा स्थितीत सामना आणला. मोहित उलवाचा जम बसला होता आणि त्याच्याकडून अपेक्षाही होत्या. तसंच घडलं. मोहित उलवाने शेवटच्या चेंडूवर चौकार मारला आणि भारत विजयी झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here